मुंबई

नागरिकांनो ऐका! आता ज्या परिसरात कोरोना रुग्ण सापडेल त्याचे होणार जीआयएस मॅपिंग

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसरांचे आयएस मॅपिंग करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याची कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. मॅपिंगमुळे त्या परिसराचे नकाशे आणि संख्यात्मक माहिती संकेत स्थळावर उपलब्ध होईल. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी त्या भागातील नागरिकांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. 

मुंबईच्या विविध भागात कोरोनाचे संशयित आढळत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिका अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून सोमवारी (ता. 30) जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 'करोना' बाधितांची संख्या अधिक असेल, त्या परिसरांचे नकाशे आणि संख्यात्मक माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. शहरातील कोणत्या भागात कोरोना बाधित आहेत, कुठे कोरोना संशयितांची संख्या जास्त आहे, याची माहिती नागरिकांनाही मिळू शकेल व ते अधिक सजगपणे स्वतःची काळजी घेऊ शकतील. तसेच त्या परिसरात काही आवश्यक कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनाही अधिक सहजपणे प्रतिबंधात्मक उपाय योजना करता येतील. प्रशासनालाही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक ती पावले तातडीने उचलण्यास या माहितीचा उपयोग होणार आहे. 

कोरोना वॉर रूम सुरू
पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये 'कोरोना‌ वाॅर रुम' सुरू करण्यात आली आहे. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर नुकत्याच रुजू झालेल्या अश्विनी भिडे या 'वाॅर रुम'च्या प्रमुख समन्वयक आहेत.  'वाॅर रुम'च्या माध्यमातून आवश्यक ती नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक व व्यवस्थापकीय कार्यवाही दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस करण्यात येईल. कोरोनाविषयक माहिती एकत्र करून तिचे सातत्याने विश्लेषण करण्यात येईल. त्याआधारे नियोजनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल.
 

Now GIS mapping of patient enclosures

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT