मुंबई

प्रतिबंधित क्षेत्र, नवीन मार्ग सर्व माहिती एका क्लिकवर; उबरच्या ऍपमध्ये आता मिळणार कोविडची माहिती

भाग्यश्री भुवड

मुंबई - उबर या ऍपमध्येही आता कोविड संदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. उबरने त्यांचे मॅप्स अपडेट केले असून ज्यात कोविडची ही माहिती दिली गेली आहे. कोणता रस्ता प्रतिबंधित क्षेत्रात येत असून तिथून प्रवास करता येऊ शकतो का? कोणता रस्ता बंद आहे ही माहिती देण्यात आली आहे. त्यासोबतच मास्क डिटेक्शन फिचर म्हणजेच ज्यात चालकाला प्रवास सुरू करण्यापूर्वी उबर ऍपमध्ये सेल्फी काढावा लागणार आहे. ज्याने चालक मास्कचा वापर करतो का? याची पडताळणी होईल. शिवाय, उबर ने रुग्णवाहिकेची सुद्धा सोय केली आहे. 

शुक्रवारी उबरने मुंबईसह जागतिक पातळीवरील 150 हून अधिक शहरातील ऍपमध्ये बदल करुन मॅप्स अपडेट केले आहेत. ज्यामुळे, चालकाला गाडी सोप्या, कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि जलद मार्गाने चालवता येईल.

ऍग्रेगेटर या कंपनीने नुकतंच मुंबई महापालिकेसोबत करार केला असून मुंबईकरांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. शिवाय, याचा फायदा रुग्णवाहिकेचा ट्रॅक ठेवण्यासाठी ही होऊ शकणार आहे. रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा येऊ नये आणि ती वेळेत रुग्णापर्यंत पोहोचावी म्हणून खूप मोठा फायदा होऊ शकतो असं सांगण्यात आले आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उबरने नवं फिचर लाॅन्च केले असून मास्कशिवाय चालक गाडी चालवूच शकणार नाही. ज्यामुळे, संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होईल.

या ऍपमध्ये बदल करण्यासाठी देशातील अनेक प्रोग्राम मॅनेजर्सनी मेहनत घेतली असून वेगवेगळ्या फिचर्स साठी दिवसरात्र मेहनत घेतली गेल्याचं उबरच्या प्रोग्राम मॅनेजमेंट डायरेक्टर मेघा येथडका यांनी सांगितले आहे.

( संकलन - सुमित बागुल )

now uber will know which area marked as contentment zone maps are updated  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan News: सिलिंडरच्या टंचाईवर बायोगॅसची मात; पाचलगावच्या महिलेचा उपक्रम; कृषी विभागाच्या मदतीने उभारले संयंत्र

Nagpur News: युद्धाच्या झळांनी ग्रामीण भाग होरपळतोय; डिझेलअभावी शेतीकामात अडथळा: पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात करणार हजर

Supreme Court: सुट्टीवर कोर्टाचा मोठा निर्णय! धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा, देशभर सुट्टीची मागणी फेटाळली

Washim News: महामार्गांवरील वृक्षतोडीला थांबवा; शहरातील नागरिकांची न्यायालयात धाव; शंभर वर्ष जुन्या वृक्षावार घाला

SCROLL FOR NEXT