मुंबई

Corona Case Study : मुंबईत NRI नागरिक राहतोय भिकाऱ्यांच्या रिलीफ कॅम्पमध्ये

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईत आता प्रायव्हेट लॅब्सला कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी देण्यात आलीये. अशात मुंबईतून आता मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर येऊ शकतात. अशात सरकारकडून आणि मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात खबरदारीचे उपाय घेतले जातायत. १ एप्रिल २०२० पर्यंत मुंबईतील एकूण १४७ जागा 'नो गो झोन' म्हणजेच सील केल्या गेल्यात. अशात मुंबईत मजूर, बेघर आणि भिकाऱ्यांसाठी संख्या पण जास्त आहे. मुंबईतील रस्त्यावर राहणाऱ्या कुणालाच कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मुंबई महानगर पालिकेकडून रिलीफ कॅम्पस देखील उभारण्यात आलेत. अशाच एका असाच एका मजूर, बेघर आणि भिकाऱ्यांसाठीच्या रिलीफ कॅम्पमध्ये चक्क एक NRI आढळून आलाय.  

नक्की काय आहे प्रकरण ? 

विशाल जैन असं या NRI नागरिकाचं नाव आहे. विशाल जैन हे ब्रिटनमध्ये असतात. विशाल जैन हे मुंबईत आले होते, आपलं सामान क्लॉक रुमध्ये ठेऊन ते मुंबईतमध्ये फिरत होते. या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. या काळात सर्व ट्रेन्स आणि वाहतूक व्यवस्था बंद  झाल्याने ते मुंबईतच अडकले. यानंतर विशाल जैन हे भिकारी, भटके, बेघर आणि मजुरांच्या रिलीफ कॅम्पमध्ये राहायला लागलेत.  विशाल जैन यांचं संपूर्ण कुटुंब हे हरियाणामध्ये आहे. जैन यांचं मुंबईत कुणीही नाही आणि सामान क्लॉकरुमध्ये असल्याने ठेवल्याने त्यांच्यावर रिलीफ कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आली.    

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी रिलीफ कॅम्पस बनवण्यात आलेले आहेत. यापैकी अंधेरीत BMC मार्फत एक रिलीफ कॅम्प उभारण्यात आलाय. यामध्ये एकूण ७५ लोकं राहतायत. याच रिलीफ कॅम्पमध्ये जैन हे देखील राहतायत. या रिलीफ कॅम्पमध्ये राहणार्यांना सरकारकडून जेवण आणि पाण्याची सोया करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण अशा प्रकारचे २६२ रिलीफ कॅम्प बनवण्यात आले आहेत. यामाध्यमातून ७० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मदत केली जातेय. याबाबतची माहिती NDTV च्या वेबसाईवर देण्यात आली होती. 

NRI citizen vishal jain is staying with beggars at andheri corona relief camp   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT