मुंबई

या जिल्ह्यात माशीमार पक्षी चोहीकडे 

सकाळ वृत्तसेवा


रोहा : लांबलेला पावसाळा आणि वादळी वातावरणामुळे रायगड जिल्ह्यातील शेती आणि बागांचे उत्पादन घटले आहे. दुसरीकडे याच वातावरणामुळे किटकांची अधिक पैदास झाल्याने माशीमार स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढली असल्याचे निरीक्षण पक्षीतज्ज्ञांनी नोंदवले आहे. 

दरवर्षी सप्टेंबरअखेर पावसाला पूर्णविराम मिळून हिवाळा सुरू होतो. त्यामुळे पुढील महिन्यापासून रायगड जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते. यंदा पावसाळा नोव्हेंबरपर्यंत लांबला. त्याचा परिणाम या पक्ष्यांच्या आगमनावर झाला. परंतु या वातावरणात किटकांची संख्या वाढल्याने या मेजवानीसाठी माशीमार पक्ष्यांची संख्या वाढली आहे. याबाबतचीा नोंद अनेक पक्षीनिरिक्षकांनी घेतली आहे. 

दरवर्षी हिवाळ्यात रायगड जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींचे दर्शन होते. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी दिसत असली, तरी माशीमार प्रजातीच्या पक्ष्यांची संख्या अधिक असल्याचे पक्षीनिरिक्षक सांगतात. 

हे वाचा : तर मुंबईत भाजपला अशक्य

ब्राह्मणी बदक किंवा चक्रांग, चमचा पक्षी, धोबी, माशीमार, स्वर्गीय नर्तक असे हिवाळी स्थलांतरित पक्षी आता जिल्ह्यात दाखल झाले आहेत, अशी माहिती पक्षीतज्ज्ञ तुषार पाटील यांनी दिली. 

अतिवृष्टी आणि दीर्घकालीन पावसाळ्यामुळे किटकांची संख्या वाढली आहे. हिमालय आणि उत्तरी देशातून येणाऱ्या माशीमार प्रजातीतील पक्ष्यांचे हे मुख्य अन्न असल्याने त्यांची संख्या जिल्ह्यात अधिक दिसून येते; पण त्यांची संख्या नेमकी किती, हे नेमके सांगणे कठीण आहे. 
- प्रथमेश देशपांडे, पक्षीतज्ज्ञ 

स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन थोडे उशिराने झाले असले, तरी नित्याने येणारे सर्व पक्षी आता नजरेस पडत आहेत. माशीमार प्रजातीच्या पक्ष्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. पक्षीनिरीक्षक याबाबत सातत्याने नोंदी घेत आहेत. 
- प्रदीप कुळकर्णी, पक्षी-अभ्यासक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT