मुंबई

कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 23 हजारांवर; रुग्णांचे बरे होणाचे प्रमाण समाधानकारक

अनिश पाटील

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 23 हजारांवर पोहोचला आहे. त्यातील 19 हजार 681 पोलिसांना कोरोनावर मात केली आहे. सुदैवाने गेल्या 24 तासांत राज्यात एकही पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झालेले नाही.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिस आही रस्त्यावर उभे आहेत. नागरिकांच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे पोलिसांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत एकूण 23 हजार 033 महाराष्ट्र पोलिस कोरोना बाधित झाले असून 245 जण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे मागील 24 तासात एका ही पोलिसाचा कोरोनाने मृत्यू झालेला नाही. दरम्यान मृत पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांचे सर्वाधिक म्हणजेच 84 पोलिसांचा समावेश आहे.

राज्यातील ग्रामीण विभागातील पोलिसांमध्ये कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू चितेंचे विषय ठरत आहे. बीड, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांतही ऑगस्ट महिन्यात कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू झाले. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या विविध तुकड्यांमध्येही ऑगस्ट महिन्यात पोलिसांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्र पोलिस दलात 29 सप्टेंबर रोजीच्या अपडेटनुसार, पुन्हा 215 नवे कोरोनाबाधित कर्मचारी आढळून आले आहेत. यानुसार राज्य पोलिस दलातील आजवरच्या एकुण कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 033 इतकी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील 24 तासात कोरोनामुळे एकाही पोलिस कर्मचारा‍र्‍यांचा मृत्यु  झालेला नाही. त्यामुळे कोरोनामृतांचा आकडा 245 इतका झाला आहे. आजवर आढळलेल्या 23033 रुग्णांपैकी 19 हजार 681 रुग्णांनी आजवर या जीवघेण्या विषाणुवर मात केली आहे. तर सद्य घडीला 3 हजार 107 कोरोनाबाधित अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी बहुतांश जणांची प्रकृती नियंत्रणात आहे.

कोरोना संकटानंतर राज्यात सोशल डिस्टंसिंग ची सक्ती करण्यात आली होती त्यावेळेस पोलिस24 तास कडक बंदोबस्तात गस्त घालत होते. मात्र मागील काही दिवसात अनेक प्रसंगात या अंतर राखा नियमाचा फज्जा उडत आहे. कंगना मुंबईत येण्याचा कालचा प्रकार असो वा रिया च्या चौकशी दरम्यान होणारी गर्दी प्रत्येक ठिकाणी गर्दीला रोखण्यासाठी पोलिसांना पुढे जावे लागत असल्याने त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे. मुंबईतील सर्वाधिक मृत्यू कंटेन्मेट झोनशी संबंधीत पोलिसांचे होते.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT