corona 
मुंबई

मुंबईसाठी पावसाळा ठरतोय जिवघेणा...दोन महिन्यात रूग्णांची संख्या दुपटीने तर मृत्यू पाचपटीने वाढला

मिलिंद तांबे

मुंबई :  मुंबईसाठी पावसाळा जिवघेणा ठरत असून गेल्या दोन महिन्यात बाधीत रूग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. तर पाचपट अधिक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात रूग्णांची संख्या वाढेल असा इशारा तज्ञांनी यापूर्वीच दिला होता.

मुंबईत कोरोनाचा पहिला रूग्ण 9 मार्च रोजी सापडला होता. त्यानंतर 31 मार्च पर्यंत रूग्णांची संख्या केवळ 151 होती तर केवळ 18 रूग्णांचा मृत्यू झाला होता. एप्रिल 30 पर्य़ंत रूग्णांचा आकडा 6874 तर 290 रूग्णांचा मृत्यू झाला होता. मे 31 पर्यंत म्हणजे पुढील दोन महिन्यात रूग्णांचा आकडा 39,464 वर तर मृतांचा आकडा 1279 इतका होता. उन्हाळ्यातील दोन महिन्यांपेक्षा पावसाळ्यात कोरोनाचा जोर वाढलेला दिसला.

पावसाच्या दोन महिन्यात बाधीत रूग्णांची संख्या दुपटीपेक्षा अधिक वाढून तो 1,13,181 वर पोहोचला. पावसाच्या केवळ दोन महिन्यात रूग्णांचा आकडा तब्बल 73,723 ने वाढला. तर मृत्यूच्या प्रमाणात पाचपट वाढ झाली असून मृत्यूचा आकडा 6297 वर पोहोचला. केवळ दोन महिन्यात 1518 मृत्यू झाले आहेत. 

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली. कडक रूग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यांच्यावर विविध रूग्णालये, कोविड केंद्रांमध्ये उपचार सुरू केले. यामुळे मुंबईतील परिस्थिती आटोक्यात येतांना दिसते. कोरोना बाधितांची संख्या वाढतांना दिसत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही दिलासादायक वाढत आहे. दिवसाला सरासरी  एक हजार रूग्ण बरे होत आहेत. आज पर्यंत 86,385 रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 75 दिवसांवर गेला आहे. तर 29 जुलै पर्यंत एकूण 5,16,714  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 23 जुलै ते 29 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.93 इतका आहे. मुंबईत 616 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 6,173 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 5,609 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 5,540 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT