मुंबई

'झी' कंपनीला याप्रकरणी उच्च न्यायालयाचा दिलासा स्वामीत्व कायद्याबाबत नोंदवले हे निरिक्षण

सुनिता महामुनकर


मुंबई : मूळ कंपनीची अधिकृत परवानगी न घेता चित्रपट प्रक्षेपित करणे प्रथमदर्शनी स्वामीत्व हक्क कायद्याचा भंग करणारे आहे, असे अंतरिम निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदविले असून 'झी' कंपनीला तूर्तास दिलासा दिला आहे.

'जंग' आणि 'कर्तव्य' या दोन सिनेमांचे प्रक्षेपण करण्यास  न्यायालयाने मनोरंजन आणि महामुवी या दोन चित्रवाहिन्यांना तूर्तास अंतरिम मनाई केली आहे. या दोन्ही सिनेमांचे  व्हिडीओ हक्क 'झी' एंटरटेनमेंट एंटरप्राइज लि.कडे आहेत. त्यामुळे सिनेमांंचे प्रदर्शन करण्यापूर्वी मूळ कंपनीकडून अधिकृतपणे परवानगी मिळणे आवश्यक आहे. मात्र ही परवानगी न घेता दोन्ही वाहिन्यांवर या सिनेमांचे प्रदर्शन करण्यात येत होते. याचिकेतील दाव्यानुसार 'जंग' सिनेमा 37 वेळा तर कर्तव्य 32 वेळा महामुवीवर तर मनोरंजनवर 'जंग' 42 तर 'कर्तव्य' 9 वेळा आतापर्यंत दाखविला गेला आहे. त्यामुळे 'झी'च्या वतीने याविरोधात न्यायालयात दावा करण्यात आला आहे.

या दाव्यांवर न्या के आर श्रीराम यांच्यापुढे नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. न्यायालयाने दावा सुनावणीसाठी मंजूर केला आहे. तसेच तूर्तास दोन्ही सिनेमांना कोणत्याही प्रकारे दाखवू नये, असे अंतरिम आदेशही प्रतिवादींना दिले आहेत. जंग सिनेमामध्ये मिथुन चक्रवर्ती, अजय देवगण यांनी काम केले असून सन 1996 मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता. तर कर्तव्यमध्ये रेखा आणि धर्मेंद्र यांच्या भूमिका आहेत. सन 1979 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

----------------------------------------------------
Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT