kunal patil press conference sakal media
मुंबई

नाना पटोले यांच्याविरोधात बदनामीकारक संदेश व्हायरल; कारवाई करा अन्यथा...

संदेश फिरवणाऱ्यांवर ठोस कारवाई व्हावी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : 27 गावांतील घरांचे रजिस्ट्रेशन (home registration) करण्यासंदर्भात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील (Kunal patil) यांच्यानावे समाज माध्यमावर (social media) काही संदेश व्हायरल (viral messege) होत आहेत. मात्र या प्रकरणाशी माझा संबंध नसून पटोले आणि माझ्या नावाची बदनामी केली जात आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada police station) तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी याची लवकर कारवाई करावी. अन्यथा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण (hunger strike warning) करेल, असा इशारा माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला आहे. या प्रकरणी मानहानीचा दावाही (Defamation claim) दाखल केला जाणार असल्याचे पाटील म्हणाले.

कल्याण डोंबिवलीतील 27 गावांत बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. बेकायदा बांधकाम ठिकाणी घर घेतल्याने ग्राहकांची फसवणूक होते. यवला आळा घालण्यासाठी या गावांतील घरांचे रजिस्ट्रेशन बंद करण्यात आले आहे. तरी देखील काहीजण घरांची नोंदणी करण्यासाठी टोकन देऊन नागरीकांकडून 70 हजार ते 2 लाख रुपये घेत आहे असा गंभीर आरोप समाजिक कार्यकर्ते नरसिंग गायसमुद्रे यांनी केला होता. यात लोकप्रतिनिधी आणि राजकीय मंडळींसह अधिकारी वर्ग लिप्त आहे.

या आरोपाची गंभीर दखल घेत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. कारण पाटील हे देखील कल्याण ग्रामीणचे आमदार आहे. जो कोणी या प्रकरणात असेल त्याचे नाव चौकशीतून समोर येईल यासाठी त्यांनी चौकशीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर घरांच्या रजिस्ट्रेशनमध्ये माजी अपक्ष नगरसेवक पाटील व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने पैसे उकळत असल्याचा संदेश सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

याच्याशी माझा काही संबंधनाही. जे कोणी हा मेसेज व्हायरल करुन पटोलेसह माझी बदनामी करीत आहेत, तत्यांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या लोकांवर लवकर कारवाई करावी अन्यथा ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय किंवा मानपाडा पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himachal Pradesh Loyal Dog Video : ...अन् ‘हे’ मन हेलावणारं भावनिक दृश्य पाहून, बचाव पथकाच्या डोळ्यातही आलं पाणी!

Latest Marathi News Live Update : शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ

Rahgiri Anand Utsav : उज्जैनमध्ये राहगिरी आनंद उत्सव; शेतकऱ्यांना समर्पित सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग

Eknath Shinde : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा झंझावात, साताऱ्यातून प्रचाराचा शुभारंभ

SL vs ENG, ODI: जो रूटचा रेकॉर्डब्रेक फॉर्म! शतक ठोकत विराट-सचिन पंक्तीत स्थान; हॅरी ब्रुकच्या वादळासमोरही श्रीलंकन गोलंदाज हतबल

SCROLL FOR NEXT