'ते' आधी निर्जनस्थळी न्यायचे, मग करायचे... 
मुंबई

'ते' आधी निर्जनस्थळी न्यायचे; मग करायचे...

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ओला-उबेर; तसेच टॅक्‍सी-रिक्षाचालकांना लुटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात वाशी पोलिसांना यश आले आहे. हे दोघे टॅक्‍सी निर्जन स्थळी घेऊन जात व चालकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याच्याजवळची रोख रक्कम व इतर ऐवज लुटायचे. किसन श्रीचंद जैसवाल (22) आणि गणेस बाबू खाडे (22) अशी या दोघा लुटारूंची नावे असून, त्यांनी मागील पंधरा दिवसांमध्ये चार टॅक्‍सी व ओला-उबेर चालकांना लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हे दोघे आरोपी वाशी गावात राहण्यास असून, ते मध्यरात्रीच्या सुमारास ओला-उबेर अथवा टॅक्‍सी-रिक्षामधून प्रवास करत असत. त्यानंतर चालकाला निर्जनस्थळी घेऊन जात, त्यांच्या गळ्यावर धारधार शस्राने वार करत त्यांच्याजवळची रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर ऐवज घेऊन पलायन करीत असत. अशाच पद्धतीने या चोरट्यांनी मागील पंधरा दिवसांमध्ये टॅक्‍सीचालक, ओलाचालक, उबेरचालक व एक रिक्षाचालक अशा चौघांना लुटले. याशिवाय उबेर कंपनीची सिलेरीओ कार चोरून नेली होती. या चारही घटनांतील चालकांच्या गळ्यावर व गालावर वार करण्यात आल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. 

ही बातमी वाचली का? ते आले, त्यांनी पाहिलं, अन्‌ ते प्रेमात पडले!
 
सोमवारी पहाटेच्या सुमारास सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करून या चोरट्यांना जेरबंद केले. त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनीच ओला-उबर व टॅक्‍सीचालकांना लुटल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेली कार व इतर ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने या दोघांना 25 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
- संजीव धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar Rain Record : महाबळेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार, 24 तासांत 513 मिमी पाऊस; मोडला तब्बल 123 वर्षांपूर्वीचा विक्रम, प्रशासनाकडून हायअलर्ट जारी

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 44 बंधारे पाण्याखाली, 3 मुख्य राज्य महामार्ग बंद; 'पंचगंगा' इशारा पातळीच्या अगदी जवळ, गगनबावड्यात 101 मिमी पाऊस

Latest Marathi News Update: खडकवासला धरणात येणाऱ्या ओढ्याला पूर, पाबे घाटरस्त्यासह महत्त्वाचे मार्ग बंद

Pune Rain: आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी पुण्यात मोठी व्यवस्था! पुढील पाच दिवस पाणी कपात देखील रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय!

Koyna Dam Update : अवघ्या काही तासांत कोयना धरणाचा पाणीसाठा 30 TMC पार; पुढील 24 तास 'हायअलर्ट', गावांना दरडीचा धोका, धरण प्रशासनाचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT