crime News sakal
मुंबई

Mumbai News: धक्कादायक! बोरीवलीतील सोसायटीच्या फ्लॅटमध्ये कुजलल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार येथील परिसरातील रहिवाशांनी केली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरिवली भागातील राजेंद्र नगरमध्ये एका उच्चभ्रू इमारतीमध्ये 78 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळुन आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ महिला त्या घरामध्ये आजारी पतीसोबत राहत होत्या. या प्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सुलोचना भास्कर शेट्टी असे मयत महिलेचं नाव आहे. बोरिवलीतील राजेंद्र नगरच्या एकता भूमी या इमारतीच्या के विंगमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होत्या. सुलोचना यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोरिवली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. फ्लॅटचा दरवाजा उघडला त्यावेळी सुलोचना यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळुन आला. तर त्यांची मुलगी त्यांना दोन दिवसांपासून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. पंरतु त्यांचा काहीच संपर्क झालेला नव्हता.

पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना सुलोचना मृत स्थितीत आणि त्यांचे पती आजारी स्थितीत आढळून आले. सुलोचना यांना मुलगी असून तिला कळवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सुलोचना भास्कर यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT