Kishori-Pednekar e sakal
मुंबई

Omicron: किशोरी पेडणेकर म्हणाल्या, चिंता वाढली त्यात काहीच दुमत नाही, मात्र...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे स्पष्ट झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. ओमिक्रॉन विषाणू मुंबईच्या वेशीवर आल्याने चिंता वाढली आहे. याबाबत आता मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी म्हटलंय की, “चिंता नक्कीच वाढली आहे त्याबद्दल काहीच दुमत नाहीये. परंतु तरी देखील घाबरून न जाता नागरिकांनी कायम जी सजगता दाखवली आहे तीच दाखवायला हवी. आपण जर दिलेल्या नियमावलीचे नीट पालन केले, तर आपण या ओमिक्रॉनला थोपवू शकतो. कोरोनाची दुसरी लाट आपण मध्यावर थोपवली होती तर तिसरी लाट येऊच दिली नाही. मी जे गेल्या चार दिवसांपासून सांगत आहे, आज हा आढळलेला रूग्ण दक्षिण अफ्रिका- दुबई-दिल्ली मार्गे महाराष्ट्रात आला. याचा अर्थ काही असे हे प्रवासी वेगवेगळ्या राज्यात उतरून, आपल्या महाराष्ट्रात, मुंबईत, आपल्या आसपासच्या शहरांमध्ये येऊ शकतात आणि म्हणूनच मला वाटतं की सर्व नागरिकांनी याबद्दल एक सजगता ठेवली पाहिजे.

पुढे त्या म्हणाल्या की, “आता सापडलेल्या रूग्णाची सौम्य लक्षणं असल्याचं समजत आहे आणि त्याच्यावर उपचार देखील सुरू आहेत. मात्र, तरी देखील हा ओमिक्रॉन जलदगतीने पसरतो, ही भीती पाहता सर्वांनी सजग होणं आणि घाबरून न जाता दिलेल्या नियमांचे नीट पालन करणं गरजेचं आहे. केंद्र, राज्य, महानगरपालिका आजही सतर्क आहेत. आमची व्यवस्था आम्ही नीट करून ठेवलेली आहे. तरी देखील लोकांनी काळजी घ्यावी व सजग रहावं. सर्वांनी लस घ्यावी, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, या प्रवाशाला 24 नोव्हेंबरला सौम्य ताप आला होता. त्याची तपासणी केली असता त्याच्यात इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, या रुग्णाचा आजार सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाच्या 12 अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि 23 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT