Oxygen  sakal media
मुंबई

ठाणे जिल्ह्यात प्राणवायूचा दीडपट साठा; संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्जता

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे (Omicron variant) ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क (Thane District Administration on Alert) झाले असून, त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायोजनाही (Treatments) सुरू केल्या आहेत. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (corona second wave) प्राणवायूच्या टंचाईची (oxygen shortage) पुनरावृत्ती घडू नये म्हणून प्रशासनाने पूर्ण खबरदारी (precaution) घेतली आहे. संभाव्य तिसरी लाट आलीच (corona third wave) तर रुग्णांच्या दीडपट इतका ४०.४९ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध (Oxygen stock) ठेवला आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णांना ३३ मेट्रिक टनची गरज भासली होती.

त्या तुलनेत हा साठा पुरेसा असून ऑक्सिजनअभावी कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाची पहिली व दुसरी लाट येऊन धडकली. सुरुवातीला हा आजारच नवीन असल्याने त्यावर उचार करण्याची पद्धत समजून घेतली जात होती. पहिली लाट ओसरून सर्व पूर्वपदावर येत असतानाच दुसरी लाट तीव्रतेने धडकली. या वेळी रुग्णांना खाटा मिळणेही अवघड झाले; तर ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यूदेखील झाला.

त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेत रुग्णांची खाटा आणि ऑक्सिजनअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात २५७ कोविड केअर सेंटरसह डेडिकेट कोविड सेंटर आणि डेडिकेट कोविड हेल्थ सेंटरसह जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून १५ हजार खाटांची सज्जता ठेवली आहे; तर ऑक्सिजनचादेखील मुबलक साठा सज्ज ठेवला आहे. आवश्यकता भासल्यास इतर यंत्रणांकडून कशा पद्धतीने ऑक्सिजन उपलब्ध करून घेता येईल, त्याचेही नियोजन प्रशासनाने केले आहे.

ऑक्सिजन प्रकल्प आणि रुग्णवाहिका

१) ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सावद (ता. भिवंडी) येथे ४८० जम्बो सिलिंडर व ३०५ लहान सिलिंडरची व्यवस्था; तर मुरबाड, वरप, भिनार येथे ३५ जम्बो आणि ४४ लहान सिलिंडरची व्यवस्था केली आहे. तीन दिवसांसाठी जिल्हा रुग्णालय आणि सावद येथे ३३.०६ मेट्रिक टनची आवश्यकता असताना तेथे ४०.९४ मेट्रिक टन ऑक्सिजनची सज्जता ठेवली आहे. जिल्ह्याच्या इतर ठिकाणी तीन दिवसांसाठी ४७.१३ मेट्रिक टनची गरज असताना त्या ठिकाणीदेखील अधिकची सज्जता आहे.

२) ठाण्यातील मुकुंद कंपनी येथेही ऑक्सिजनच्या १५० मेट्रिक टन प्लांटची तयारी झाली आहे; तर ५ लिटरच्या ४० कंटनेर आणि ३६ ड्युरा सिलिंडर सज्ज ठेवले आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांचीदेखील सज्जता ठेवली आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात ७, महिला रुग्णालय १, सेंट्रल हॉस्पिटल (उल्हासनगर) ३, ग्रामीण तसेच उपजिल्हा रुग्णालयात १६, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३३ तसेच इतर ठिकाणच्या धरून ६० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

"ओमिक्रॉनच्या या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आढळून आलेले नाहीत. तसेच अशा प्रकारचे काही रुग्ण आढळून आल्यास व तिसरी लाट आल्यास तिचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी झालेली गैरसोय टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात छोटे, ड्युरा सिलिंडर उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा रुग्णालय आणि सावद येथे ऑक्सिजन प्लांटदेखील उभारण्यात आले आहेत."
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! धरणांमध्ये 70 टक्के पाणीसाठा, पाणीटंचाईला दिलासा!

Nagpur News : सांगा, कसं करायचं आपत्ती व्यवस्थापन? अनेक गावं धोकादायक पातळीवर, पण सरकार अजूनही झोपेत, ९१ गावांत ‘व्हिलेज किट’च नाही...

Guru Purnima : 'श्री स्वामीचरणी तीन लाख भाविक नतमस्तक'; स्वामीनामाच्या जयघोषात श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी

11th Admission Process: अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी 'या' तारखेला होणार जाहीर; जाणून घ्या जाणून घ्या प्रवेशाचे पुढचे टप्पे

धक्कादायक! प्रेमसंबंधातून जन्मदात्या आईने पोटच्या तीन निष्पाप मुलांची केली हत्या; प्रियकराला जन्मठेप तर, आईला मृत्युदंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT