Mumbai Metro Esakal
मुंबई

Mumbai Metro : PM मोदींच्या मुंबई दौऱ्याचा सामान्यांना फटका; मेट्रोबाबत...

मेट्रो सेवा बंद असल्याने मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (19 जानेवारी) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव त्या परिसरातील मेट्रो बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संबधी माहिती ट्विट करून देण्यात आली आहे.

महानगरीतील नोकरदार वर्गासाठी लोकल ट्रेन अतिशय महत्वाची आहे. मुंबई मेट्रो देखील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा महत्त्वाचा पर्याय आहे. मुंबई मेट्रो प्रवास करणाऱ्यांचे उद्या हाल होणार आहेत. उद्या म्हणजेच 19 जानेवारीला मुंबई मेट्रोची घाटकोपर ते वर्सोवा येथील मेट्रो सेवा बंद राहणार आहे.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. याच दिवशी मुंबईची मेट्रो सेवा संध्याकाळी 5.45 ते 7.30 वाजेदरम्यान बंद राहणार आहे. संध्याकाळी ऑफिस सुटण्याची ही वेळ असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र मेट्रो सेवा बंद असल्याने मुंबईकरांना मोठ्या त्रास सहन करावा लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. जवळ जवळ दीड लाख लोक या सभेला हजर राहतील यासाठी दोन्ही पक्षानी प्रयत्न केले आहेत.

मुंबईत या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईत शिंदे गट आणि भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे यांचे मोठमोठे बॅनर्स आणि कटआऊट्स लावण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT