Sharad-Pawar-Devendra-Fadnavis Twitter
मुंबई

'शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र नक्कीच दिला असेल'

काय म्हणाला शिवसेना नेता...

वैदेही काणेकर

मुंबई: राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीसंदर्भात आज पत्रकारांनी शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत यांचं मत जाणून घेतलं. "महाविकास आघाडी सरकारला (MVA Govt) विरोधी पक्षाने सहकार्य करणं आवश्यक आहे. या संदर्भात पवारसाहेबांनी फडणवीसांना नक्कीच मार्गदर्शन केलं असेल" असं संजय राऊत म्हणाले. (On sharad pawar devendra fadnavis meet sajay raut reaction )

"महाराष्ट्राला विरोधी पक्षांची मोठी परंपरा आहे. शरद पवार विरोधी पक्ष नेते होते. त्याकाळात विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी उत्तम काम केलं आहे. आपण इतर राज्यांप्रमाणे शत्रुत्व घेऊन बसत नाही. तुम्ही त्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणं चुकीचं आहे" असं संजय राऊत म्हणाले.

"शरद पवारांनी भेटीमध्ये देवेंद्र फडणवीसांना सत्तेचा मंत्र नक्कीच दिला असेल. सत्तेचा मंत्र अशा प्रकारे दिला असेल, ज्या पद्धतीने विरोधी पक्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ निर्माण करतो आहे. त्यामुळे पुढील शंभर वर्षे तरी महाराष्ट्रात विरोधी पक्षाची सत्ता येणार नाही अशा प्रकारचा हा मंत्र असेल" असे संजय राऊत म्हणाले.

प्रत्येक भेटीचा असा राजकीय अर्थ काढणं योग्य नाही. या भेटीनंतर 'ऑपरेशन लोटस' ची चर्चा सुरु झाली आहे. "'ऑपरेशन लोटस' बंगाल, महाराष्ट्रात विसरुन जा. हे यशस्वी होणार नाही" असा राऊत यांनी दावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

INDA vs SLA Test: ऋतुराज गायकवाड, देवदत्तने संधी गमावली; साई सुदर्शनची सेंच्युरी, तर ध्रुव जुरेल, शेख राशीदची दमदार फिफ्टी

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

SCROLL FOR NEXT