file photo
मुंबई

विक्रोळीत हाय वे वर आंब्याची झाडं लावणार

नर्सरीमध्ये जांभूळ आणि आंब्याची झाडे लावली आहेत.

कुलदीप घायवट

मुंबई: मागील वर्षी उन्हाळ्यात आंबा, जांभळे खाऊन बिया फेकून न देता त्याचे रोपण करण्यात आले. (Mango trees) आता या ४०० हून अधिक रोपट्यांची लागवड यंदाच्या मान्सूनमध्ये विक्रोळी द्रुतगती ( vikroli high way) मार्गाच्या परिसरात चार्ली स्पोर्ट्स क्लबकडून करण्यात येणार आहे. (On vikroli high way mango trees will plant)

मागील 35 वर्षाहून अधिक काळापासून चार्ली स्पोर्ट्स क्लब सामाजिक सेवेचे काम करत आहे. लॉकडाऊनच्या काळात मागील एक वर्षांपासून चार्ली स्पोटर्स क्लबने विक्रोळी येथील नर्सरीमध्ये जांभूळ आणि आंब्याची झाडे लावली आहेत. ही झाडे 400 हुन अधिक असून, आता या झाडांची उंची तीन ते चार फुट झाली आहे. त्यामुळे ही झाडे विक्रोळी द्रुतगती परिसरासह लगतच्या परिसरात लावण्यात येणार असल्याचे क्लबकडून सांगण्यात आले.

जी फळे खाल्ली गेली, त्या फळांच्या बिया टाकून न देता क्लबने ही झाडे उभी केली आहेत. या झाडांच्या माध्यमातून येथील परिसर हिरवळीचा होईल. शिवाय प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास क्लबने व्यक्त केला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी मोफत 5 हजार पिंपळ रोपांचे वाटप केले जाणार आहे, असे क्लबकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT