Buffalo Sakal
मुंबई

एका दिवसापूर्वी विकत घेतलेली लाडकी म्हैस पडली 12 फूट खोल गटारात अन्...

म्हैस गटारात पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथे एक म्हैस १० ते १२ फूट खोल गटारात पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल पाच तास प्रयत्न करत या म्हशीला सुरक्षितपणे बाहेर काढण्याच यश आलं आहे. विशेष म्हणजे एका दिवसापूर्वी विकत घेतलेली म्हैस गटारात पडल्यामुळे मालकाचा जीव टांगणीला लागला होता. पण म्हैस सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

घाटकोपर येथील एका मॅनहॉल मध्ये मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास एक भलीमोठी म्हैस घाटकोपर अंधेरी लिंक रोड आणि एलबीएस मार्ग जंक्शन एक येथील उघड्या गटारात पडली. मालकाने एकच दिवस आधी विकत घेतलेली म्हैस 10 ते 12 फूट खोल गटारात पडल्यानंतर त्यांचा जीव टांगणीला लागला होता. ही म्हैस गटारात पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्यानंतर ती गटारात अडकून पडली. त्यानंतर स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल पाच तास म्हशीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते.

गटार तोडले तर म्हशीला इजा होईल म्हणून अग्निशमन दलाचे काही जवान गटारात उतरले. त्यांनी म्हशीला मोठी रस्सी बांधून पंधरा ते वीस जवानांनी अक्षरशः हाताने खेचून ही भली मोठी म्हैस बाहेर ओढली. त्यानंतर जेसीबीने तिला वर खेचण्यात आले. सुमारे पाच तास चाललेले हे बचाव कार्य पहाटे सहा वाजता संपले आणि सुरक्षित म्हैस बाहेर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT