employees 
मुंबई

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री निधीला एक दिवसाचे वेतन, इतक्या कोटींचे सहाय्य

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यातील वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने घेतला आहे. 

राज्यात सुमारे साडेपाच लाख सरकारी कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून राज्य सरकारला सुमारे 300 कोटी रुपये मिळू शकतात, असे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने म्हटले आहे. कोरोना महामारीच्या काळात मार्चचे वेतन 25 टक्के कमी घेऊनही कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कुचराई केलेली नाही. त्याबद्दल सरकारनेही कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

राज्य सरकारी कर्मचारी हा राज्य सरकारचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणीच्या काळात एकमेकांना मदत करणे परस्परांच्या हितास पूरक आहे. त्यामुळे संघटनेने सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. या मदतीबद्दल राज्य सरकारने कर्मचारी संघटनेला धन्यवाद दिले आहेत.

One day's salary to CM fund from state government employees

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT