azim premji 
मुंबई

दीडवर्षे कोरोनामुळे शिक्षणाची हानी, अझीम प्रेमजींनी व्यक्त केली चिंता

प्रेमजी विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम

कृष्ण जोशी - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: गेली दीड वर्षे कोरोनामुळे (corona) शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी (education loss) झाल्याबद्दल विप्रोचे संस्थापक अध्यक्ष (vipro chairman) अझीम प्रेमजी (azim premji) यांनी चिंता व्यक्त केली असून ही हानी भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत असे आवाहन केले आहे. बाँबे चार्टर्ड अकाउंटंट्स सोसायटी च्या 73 व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते. कोविडकाळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी चांगल्या दर्जाचे सार्वजनिक शिक्षण महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले. (one & half year corona situation education loss vipro chairman azim premji concern)

दीड वर्षांत शिक्षणातील नुकसान भरून काढण्यासाठी आपल्या शेजारच्या मोकळ्या परिसरात खुले शिक्षण, शिक्षकांचे लसीकरण मुद्यांवर भर दिला पाहिजे. सध्या शाळा बंद असल्याने सामान्य मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्यासाठी आपल्याच परिसरात मोकळ्या जागी खुल्या आकाशाखाली शाळा घ्याव्यात, त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होईल.

शिक्षकांचेही लसीकरण झाल्यावर धोका संपूर्णपणे संपेल. त्यानंतर कोरोनाकाळात झालेला तोटा विसरता कामा नये, तो भरून काढण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी शिक्षकांना विशेष साह्य करून जरुर तर पुढीलवर्षी मुलांनाही वेगळे शिक्षण द्यावे, असेही प्रेमजी म्हणाले.

कोविडचे सावट संपल्यावर आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांची पुनर्बांधणी करण्यात आपण सर्वांनीच सरकारला सहकार्य केले पाहिजे, यावरही त्यांनी भर दिला. या क्षेत्रात प्रशासनाचा हेतू चांगला असतो, त्यांचा तळागाळात संपर्कही असतो तसेच साधनसामुग्रीही असते. मात्र टिपिकल बाबुशाही यंत्रणेतून बाहेर पडून काम करण्यात प्रशासन कमी पडते. त्यामुळे या कामात सरकारची मदत केली तर एकमेकांच्या मदतीने सर्वांचाच उत्कर्ष होईल, अशी खात्रीही प्रेमजी यांनी व्यक्त केली. या ऑनलाईन संमेलनात सोसायटीचे अध्यक्ष सुहास परांजपे, माजी अध्यक्ष नौशाद पंजवानी आदींनीही आपले विचार मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT