अकरावीच्या सव्वा लाख जागा शिल्लक 
मुंबई

अकरावीच्या सव्वा लाख जागा शिल्लक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात अकरावीसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ फेरीच्या पहिल्या प्रकारात ३९० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतले. त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी एक लाख ३३ हजार ७९ जागा शिल्लक आहेत. मुंबईतील नामवंत कनिष्ठ महाविद्यालयांतील जागा यंदा रिक्त राहिल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहीहंडीमुळे पुढील प्रवेश फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रकही उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पुढील फेऱ्यांसाठी एक लाख चार हजार ७६६ जागा उपलब्ध आहेत. ‘इनहाऊस’, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यांत २८ हजार ४१३ जागा आहेत. ‘प्रथम प्राधान्य’ फेरीत पहिल्या प्रकारातील दहावीत ८० टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळालेल्या ५३१ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांची निवड केली होती. अशा विद्यार्थ्यांना २१ व २२ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्‍चित करावयाचे होते. त्यापैकी ३९० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. 

दुसऱ्या प्रकारात ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुणांसह दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी रिक्त जागांची माहिती गुरुवारी (ता. २२) सायंकाळी संकेतस्थळावर जाहीर झाली. या विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी ५ वाजेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करता येईल. त्यानंतर २६ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत त्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्‍चित करावे लागतील. तिसऱ्या प्रकारात सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर मिळेल. या विद्यार्थ्यांना २७ ऑगस्टला महाविद्यालय निवडता येईल. 


शाखानिहाय स्‍थिती...
शाखा    रिक्त जागा 
कला :          १४,५८६ 
वाणिज्य :     ४६,७३४ 
विज्ञान :      ४०,७७४ 
एमसीव्हीसी :    २५७२ 
एकूण :    १,०४,६६६ 

कोट्यासाठी रिक्त जागा
शाखा :         रिक्त जागा 
इन-हाऊस :       ५२६५ 
अल्पसंख्याक :    १४,२८६ 
व्यवस्थापन :    ८३२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT