मुंबई

धक्कादायक ! ''तुमची पेटीएम सेवा २४ तासात बंद होईल, आधी नमूद केलेल्या नंबरवर फोन करा''

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : "केवायसी' न केल्यास पेटीएम (PayTm) सेवा बंद होईल, अशी भीती घालून भामट्यांनी काही जणांकडून लाखो रुपये लुबाडल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, फसवणूक झालेल्यांमध्ये डॉक्‍टर आणि पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

"केवायसी' न केल्यास पेटीएम सेवा 24 तासांत बंद होईल. त्यासाठी नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा', असा संदेश शीव येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. महावीर यादव यांना मिळाला. त्यानंतर डॉ. यादव यांनी कोणतीही खातरजमा न करता संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.

समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितले. त्या लिंकवर यादव यांनी क्‍लिक करताच मोबाईल किंवा संगणक परस्पर हाताळण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे ऍप डाऊनलोड झाले; मात्र त्याबाबत त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांना पेटीएम खात्यात 50 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. ती रक्कम त्यांनी भरल्यावर थोड्याच वेळात त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये काढून घेण्यात आले. 

गिरगाव येथे राहणारे आणि खासगी कंपनीत नोकरी करणारे अभिजित देसाई यांनाही अशाच प्रकारे गंडा घालण्यात आला. आपल्याला आलेला संदेश पेटीएमनेच पाठवल्याचे समजून त्यांनी "क्विक सपोर्ट' ऍप डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून 90 हजार रुपये गायब झाले. या प्रकरणांत गुन्हे दाखल केला असून, तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसाला ऑनलाईन खरेदी महागात 

राज्य पोलिस दलात शिपाई असलेले हेमंत सातर्डेकर यांनी ऑनलाईन संकेतस्थळावरून मनगटी घड्याळ मागवले. घरपोच मिळालेल्या घड्याळात बिघाड असल्याचे आढळल्यामुळे त्यांनी ते परत केले. परंतु आधीच भरलेले पैसे त्यांना परत मिळाले नव्हते. त्यासाठी त्यांनी संबंधित संकेतस्थळाच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला. दूरध्वनीवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याकडून कार्ड क्रमांक आणि ओटीपी असा तपशील मागून घेतला. त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातून 70 हजार रुपये काढून घेण्यात आले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update : कांदा खरेदीतील अनियमिततेवर विधिमंडळात अर्धातास चर्चा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

SCROLL FOR NEXT