मुंबई

VIDEO : एकाच बेडवर झोपलेत दोन रुग्ण, मुख्यमंत्रीसाहेब 'हे' पाहतायत ना?

मिलिंद तांबे

मुंबई ,ता. 9 : सायन रूग्णालयातील कोरोना संशयितांची हेळसांड सुरू असल्याचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. कोरोना संशयितासाठी बनवण्यात आलेल्या वॉर्ड मध्ये एका बेडवर चक्क दोघा रुग्णांना दाटीवाटीने झोपवण्यात आले असून रुग्णांची परवड होत असल्याचे दिसते. सायन रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठी आहे, आम्ही कुणालाही नाकारत नाही, सर्व रुग्णांना दाखल करून घेत आहोत. त्यामुळे वॉर्डमध्ये गर्दी होत असल्याचे अधिष्ठाता डॉ प्रमोद इंगळे यांनी सांगितले.

सायन रूग्णालयातील कोरोना वॉर्ड मध्ये प्लास्टिक मध्ये गुंडाळलेल्या मृतदेहांचा खच पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती. हे प्रकरण ताजे असतांनाच याच रुग्णालयातील कोरोना संशयितांचा वॉर्ड मधील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील दृश्यांनुसार या वॉर्डमध्ये कोरोना संशयितांची प्रचंड गर्दी दिसते आहे. एका बेडवर चक्क दोन रुग्णांना झोपवण्यात आले आहे. त्यातील काही रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याचे दिसते. काही रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. काही रुग्ण दोन बेडच्या मधील चिंचोळ्या जागेत खाली फरशीवर झोपले आहेत तर काही रुग्णांना बेड किंवा फरशी ही मिळाली नसल्याने व्हीलचेअर वरच बसावे लागले आहे. 

सायन हे मुंबईतील महत्वाचे रुग्णालय असल्याने इथे नेहमीच रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे रुग्णालयातील प्रत्येक वॉर्ड मध्ये रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांची गर्दी वाढल्याचे दिसते. मात्र कोरोना संशयितांच्या वॉर्ड मध्ये सोशल डिस्टनसिंग पाळणे अनिवार्य असताना देखील रुग्णालय प्रशासन त्याकडे दुर्लक्ष होतंय. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना देखील कोरोना संसर्ग होण्याची भीती असून हा संसर्ग आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

व्हायरल व्हिडीओ सायन रुग्णालयाचा असल्याचे डॉ. इंगळे यांनी सांगितले. सायन रूग्णालयात धारावी,कुर्ला,चेंबूर,गोवंडी मानखुर्द सह अनेक परिसरातील रुग्ण मोठ्या संख्यने येत असतात. रुग्णालायत जागा नसली तरी आम्ही कोणत्याही रुग्णाला नाकारत नाही , त्याला दाखल करून उपचार करतोय. रुग्णालयात जागा नसल्याने काही वॉर्ड मध्ये एका बेडवर दोघा रुग्णांना ठेवावे लागतेय. अश्याही परिस्थिती रुग्णांवर उपचार करून त्यांचा जीव वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती डॉ. इंगळे यांनी दिली.

one more sion video viral on internet where two patients are sleeping on one bed 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT