मुंबई

मुंबईकरांना दिलासा! एक हजार इमारती कोव्हिडमुक्त; सहा दिवसांत रुग्णांचे प्रमाणही घटले

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईतील कोव्हिड नियंत्रणात येत असताना इमारतींमधील रुग्णांचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. मागील सहा दिवसात एक हजार 24 इमारती कोव्हिडमुक्त झाल्या आहेत; तर 29 वस्त्यांही कोव्हिडमुक्त झाल्या आहेत. मुंबईत कोव्हिडचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सध्या 157 दिवसांवर आला आहे. कोव्हिड वाढीचा दर 0.44 टक्‍क्‍यांवर आला आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून इमारतींमधील कोव्हिडचे रुग्ण वाढू लागले होते. सप्टेंबरअखेरपर्यंत 70 टक्के रुग्ण हे इमारतींमधील होते; मात्र आता इमारतींमधील रुग्णांची संख्या वेगाने घटू लागली असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील सध्या 7 हजार 479 इमारतींमध्ये कोव्हिडचे रुग्ण आढळल्याने या इमारती बंद करण्यात आल्या आहेत. 24 ऑक्‍टोबर रोजी 8 हजार 503 इमारतीमध्ये कोव्हिडचे रुग्ण आढळल्याने त्या बंद करण्यात आल्या होत्या. 24 सप्टेंबर रोजी 632 वस्त्यांमध्ये कोव्हिडचे रुग्ण होते; तर आता 603 वस्त्यांमध्ये कोव्हिडचे रुग्ण आहेत. दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून कोव्हिडचा हॉटस्पॉट असलेल्या बोरिवलीत सध्या 929 इमारतींमध्ये कोव्हिडचे रुग्ण आहेत. मालाडमध्ये 673 इमारतींमध्ये कोव्हिडचे रुग्ण आहेत. 

एक लाख नागरिक बंधनमुक्त 
मागील सहा दिवसांत इमारतींमध्ये राहणाऱ्या एक लाख नागरिकांची कोव्हिडची निर्बंधातून मुक्तता झाली आहे. सिल इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन वावराही काही बंधने येतात. इमारत कोव्हिडमुक्त झाल्यानंतर ही बंधने शिथिल केली जातात. दुसऱ्या बाजूला वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अवघ्या 10 हजार नागरिकांची अशा प्रकारच्या बंधनातून मुक्तता झाली आहे. 

सहा दिवसांतील कोव्हिडमुक्त इमारती 
परिसर इमारतींची संख्या 
बोरिवली 329 
कांदिवली 171 
मालाड 14 
-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT