Thane Municipal Corporation  sakal media
मुंबई

ठाणे : तिसऱ्या खाडी पुलावरील एक मार्गिका मे अखेरपर्यंत होणार खुली !

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाची आयुमर्यादा संपुष्टात आल्याने तिसरा खाडीपूल (bridge on creek) उभारण्यात येत आहे. सोमवारी ठाणे पालिका (Thane Municipal corporation) आयुक्त डॉ. विपीन शर्मा (dr vipin sharma) यांनी या कामाची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या या पुलाच्या कामाचा वेग वाढविण्याच्या (Bridge work) सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या; तर मे महिना अखेर पुलाच्या एका मार्गिकेचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

ठाणे पालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी रविवारी सुटीच्या दिवशीही शहराचा दौरा करून तलाव सुशोभीकरण, रस्ते आणि साफसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यापाठोपाठ त्यांनी सोमवारी कळवा खारेगाव परिसरातील विकासकामांची पाहणी केली. या दौऱ्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपुल्ले, मारुती खोडके यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

ठाणे व कळवावासीयांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाची आयुक्तांनी पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना केल्या. तसेच जुन्या पुलावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मे महिनाअखेर पुलाची एक मार्गिका सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. एक मार्गिका सुरू झाल्यास ठाणेकरांसह कळवावासीयांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

कळवा रुग्णालयाची रंगरंगोटी

गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची देखील आयुक्तांनी पाहणी केली.
रुग्णालयातील विविध विभागांना भेटी देऊन तेथील समस्या व अडचणी जाणून घेतल्या. तसेच असलेल्या सुविधांच्या सक्षमीकरणाबरोबरच रुग्णालयाची किरकोळ दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

शहर स्वच्छतेला प्राधान्य

१) आयुक्त विपीन शर्मा यांनी कळवा परिसरातील विविध भागांना भेटी देऊन रेतीबंदर गणेश विसर्जन घाट, आत्माराम पाटील चौक, रेतीबंदर खारेगाव रोड, साईनाथ नगर, सह्याद्री स्कूल, कळवा चौक आदी ठिकाणांची पाहणी केली. यावेळी शहर स्वच्छतेला प्राधान्य देत रस्त्यांची नियमित साफसफाई, रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी, पदपथ साफ ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या.

२) पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी साईनाथनगर येथील मुख्य नाल्याची रुंदी वाढविणे, सह्याद्री स्कूल येथील पदपथाची दुरुस्ती, मुख्य रस्त्यावरील दुभाजकाची दुरुस्ती व रंगरंगोटी, दुभाजकांमध्ये झाडांची लागवड व देखभाल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच कळव्यातील कै. मुकुंद केणी क्रीडा संकुलाची देखील पाहणी करून येथील सुविधांचा आढावा आयुक्तांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT