मुंबई

एका वर्षानंतरही रुग्णांना करावा लागतोय ‘लाँग कोविड’चा सामना, वैद्यकीय टास्क फोर्सच्या सदस्यांचे मत

भाग्यश्री भुवड

मुंबई, 17  :  कोविड 19  चा जगात प्रवेश होऊन या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या 12 महिन्यात कोविड 19 ने 9.74 दशलक्ष भारतीयांना आपले लक्ष्य बनवले. मात्र, याचे दुष्परिणाम एक वर्ष पूर्ण होत आले तरी कायम आहेत. कोविडनंतरच्या या दुष्परिणामांच्या संकल्पनेला लाँग कोविड असे म्हटले जात असून या संकल्पनेचे रुग्णांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होत असल्याचे वैद्यकीय टास्क फोर्सच्या सदस्यांचे म्हणणे आहे. 

87.4 टक्के रुग्णांमध्ये किमान 3 महिने आजाराची लक्षणे - 

द जर्नल अमेरिकन मेडिकल असोसिएशनतर्फे रोम, इटलीच्या फॉण्डाझिऑन पॉलिक्लिनिको युनिव्हर्सिटॅरिओ अगोस्टिनो जेमिल्ली आयआरसीसीएसने 143 रुग्णांचा केलेला अभ्यास नुकताच प्रकाशित करण्यात आला. रुग्णालयाच्या ओपीडीत आलेल्या कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांचा यात अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासांती असे दिसून आले की, कोविड-19 मधून बऱ्या झालेल्या रुग्णांपैकी 87.4 टक्के रुग्णांमध्ये बरे झाल्यानंतर जवळपास 2 ते 3 महिन्यांपर्यंत आजाराची लक्षणे दिसत होती. कोविड-19 मधून बऱ्या झालेल्या रुग्णांवरही या संसर्गाचे दीर्घकालीन दुष्परिणाम दिसून येत आहेत. 

लाँग कोविड म्हणजे काय ? 

कोविड होऊन गेल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत त्याची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांना लाँग कोव्हिडची लागण झाल्याचे म्हटले जाते. यात केवळ दीर्घकाळ अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णांचाच समावेश नसून ज्या रुग्णांना कोविडची अगदी सूक्ष्म लक्षणे दिसून आली आणि ज्यांना रुग्णालयात भरती होण्याची गरजही भासली नाही, अशा रुग्णांचाही यात समावेश आहे. थकवा येणे, कमी हालचालीनंतरही श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, स्नायुदुखी आणि सांधेदुखी, ऐकू कमी येणे, दृष्टीदोष, वास न येणे आणि तोंडाची चव जाणे ही लाँग कोविडची सर्वसाधारण लक्षणे आहेत. लाँग कोविड झालेल्या बऱ्याचशा रुग्णांना मानसिक स्वास्थ्यविषयक समस्याही उद्भवल्याचे दिसून आले आहेत. यात तणाव, चीडचीड यापासून डिप्रेशनपर्यंतच्या लक्षणांचा समावेश आहे.

त्यामुळे, कोविड रिकव्हरीच्या काळात रुग्णांनी डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहणे आवश्यक असते. आवश्यक असलेल्या काही तपासण्या, जीवनशैलीतील बदल किंवा औषधोपचार याविषयी डॉक्टर योग्य तो सल्ला देऊ शकतील. डॉक्टरी सल्ल्यानुसारच औषधे घ्या असे मत वैद्यकीय टास्क फोर्सच्या डॉ. राहूल पंडीत यांनी व्यक्त केले आहे.

one year of pandemic people are still suffering from long covid says doctors of task force

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT