मुंबई

डॉक्टर तुम्हीसुद्धा ! 25 हजारांपैकी केवळ 'इतकेच' खासगी डॉक्टर कोविड रुग्णांवर उपचार करण्यास तयार

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 12 : सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा देण्याचे आवाहन राज्य वैद्यकीय विभागाने खासगी डॉक्टरांना केले होते. त्याला प्रतिसाद देत 1172 डॉक्टरांनी सरकारला सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. शहर आणि देश वाचवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत जिथे आवश्यकता असेल तिथे सेवा द्यायला त्या डॉक्टरांनी तयारी दर्शवली आहे.

राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाकडून शहरातील 25 हजार डॉक्टरांना सरकारी रुग्णालयांतील कोविड 19 बाधित रुग्णांना सेवा देण्यासंबंधी नोटीस बजावली होती. आपत्ती व्यवस्थापन कायदा , महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायद्या अंतर्गत ही नोटीस बजावली होती.

यानुसार डॉक्टरांना निदान 15 दिवस आपली सेवा देणे अनिवार्य आहे. जे डॉक्टर सेवा देण्यास नकार देतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच त्यांचं लायसन्स रद्द करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

सर्व डॉक्टरांना एक फॉर्म सादर करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये त्यांना त्यांची पात्रता, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणी क्रमांक, सध्याचे कामाचे स्थान आणि पोस्टिंगसाठी त्यांची जागा निवडणे आवश्यक आहे. राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ तात्याराव लहाने यांनी संगितले की आतापर्यंत 7 हजार डॉक्टरांनी प्रतिसाद दिला आहे. त्यातील 35 वर्षांखालील 1172 डॉक्टरांनी कोविड 19 रुग्णांवर उपचार करण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र काही डॉक्टर्स कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार करत असल्याने त्यांनी असमर्थता दर्शवली आहे तर काहींनी इतर वैद्यकीय अडचणी सांगितल्या आहेत.

मुंबई महापालिकेकडून प्रत्येकी 50 डॉक्टरांचे पथक सेव्हन हिल, सायन रुग्णालय, ट्रॉमा सेंटर आणि भाभा रूग्णालयात नियुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या आयसोलेशन सेंटरमध्ये देखील काही डॉक्टरांची नेमणूक करणार असल्याचे डॉ लहाने यांनी सांगितले.

एमबीबीएस डॉक्टरांना 80 हजार, एमडी-एमएस डॉक्टरांना 1 लाख रुपये तर इंटेनसिविस्ट डॉक्टर्सना 1 लाख 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या डॉक्टरांना त्यांच्या इच्छेनुसार नियुक्ती दिली जाणार आहे. अधिकाधिक डॉक्टर लवकरच रुजू होतील अशी अपेक्षा ही डॉ लहाने यांनी व्यक्त केली. मुंबई कोविड 19 संसर्गाचा हॉट स्पॉट झाल्यानंतर अनेक खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केले. तर अनेक डॉक्टर सर्दी, ताप आणि श्वसनास त्रास असलेल्या रुग्णांना तपासण्यास नकार देत असून त्यांना 'फिवर क्लिनिक' मध्ये जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

only 1172 private doctors are helping in covid hospitals in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT