मुंबई, ता. 4 : मुंबईत रविवारी दिवसभरात कोरोनामुळे केवळ 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर देखील कमी करण्यात मुंबई महापालिकेला यश आल्याचे दिसून येतेय. मुंबईतील रविवारच्या एकूण मृतांचा आकडा 11,135 इतका झाला आहे. मुंबईत आज रविवारी 581 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 2,95,240 झाली आहे. तर काल 697 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,75,464 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे.
महत्त्वाची बातमी : टाळेबंदीत अपघात घटले, मृत्यू वाढले! नऊ महिन्यांत दहा हजार जणांचा मृत्यू
मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 356 दिवसांवर गेला आहे. तर 2 जानेवारीपर्यंत एकूण 23,93,590 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 27 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.21 इतका आहे. मुंबईत रविवारी मृत झालेल्या 2 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये सर्व महिलेचा समावेश आहे. मृत झालेल्यांपैकी 2 रुग्णांचे वय 40 ते 60 च्या दरम्यान होते. एका रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.
मुंबईत 221 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 2,090 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 2,666 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 398 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.
( संपादन - सुमित बागुल )
only three passed away amid corona in mumbai great work by citizens of mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.