मुंबई

कल्याणमध्ये मैदानात खुलेआम सिलिंडर विक्री;  नागरिकांची आयुक्तांकडे तक्रार 

रवींद्र खरात

कल्याण : नागरिकांना घरोघरी पुरवठा करणाऱ्या गॅस सिलिंडर एजन्सी चालकाकडे संकलन आणि वितरणासाठी नियमानुसार गोदाम असणे आवश्‍यक आहे. मात्र, कल्याण पूर्वेतील एका दाट वस्तीत खुलेआम मैदानामध्ये गॅस सिलिंडरचे संकलन आणि वितरण करण्यासोबतच अनेक मोठ्या वाहनांचे पार्किंग केले जाते. आता दिवाळी आली असून, फटाक्‍यांमुळे या ठिकाणी दुर्घटनेची शक्‍यता स्थानिकांनी वर्तवली आहे. याबाबत नागरिकानी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले आहे. 

कल्याण पूर्वेमधील पुना लिंक रोडवर नाल्याच्या बाजुला असलेल्या कोहिनूर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर गॅस सिलिंडर एजन्सी आहे. या एजन्सीचे लगतच्या परिसरात सिलिंडर संकलन आणि वितरणासाठी आवश्‍यक असलेले गोदाम नाही. यामुळे संबंधित एजन्सीच्या सिलिंडरने भरलेले 4 ते 5 ट्रक रस्त्यावरच पार्क केले जातात.

तर येथील खुल्या मैदानात ही ट्रकचे पार्किंग केले जाते आणि तेथूनच सिलिंडर लहान वाहनात भरून ग्राहकांना वितरणासाठी पाठवले जातात. हा प्रकार दिवसभर चालू असतो. तेथे काम करणारे कर्मचारी मद्यसेवन करून एकमेकांत भांडत असतात. त्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. 

दरम्यान, संभाव्य धोक्‍यापासून येथील रहिवाशांची सुटका व्हावी या उद्देशाने या परिसरातील काळू को. ऑ. हौसिंग सोसायटीने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली आहे. दिवाळी जवळ आली असून दुर्घटना घडल्यावर सरकारी यंत्रणा जागी होणार का? असा सवालही निवेदनातून करण्यात आला आहे. 

गॅस एजन्सीबाबत नागरिकांची तक्रार प्राप्त झाली आहे. सिलिंडर वितरण आणि संकलन खुलेआम करणे धोक्‍याचे आहे. याबाबत वाहतूक पोलिस आणि कोळसेवाडी पोलिसांना कारवाई करण्याबाबत कळविले आहे. 
- भारत पाटील, पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी 

लोकधारा रोडवरील  काळू को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बाजूला असलेल्या गॅस एजन्सी चालक रस्त्यावरच सिलिंडरच्या गाड्या उभ्या करतात. येथे दुर्दैवाने एखादी आग लागली तरी सुरक्षात्मक उपाययोजना नाहीत. या भागात नागरिकांची रहदारीही मोठ्या प्रमाणात असते. दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?  पालिकेने कारवाई करावी. 
- सुभाष म्हस्के, स्थानिक नागरिक

----------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT