मुंबई

"ताज'च्या शुल्कमाफीवरून महाआघाडीत ठिणगी; BMC च्या सर्व विरोधी पक्षांचा सभात्याग

समीर सुर्वे

मुंबई : कुलाबा येथील ताज हॉटेलचे शुल्क माफ करण्यावरुन महापालिकेच्या स्थायी समितीत आज महाविकास आघाडीत ठिणगी पडली. मतदान न घेता परस्पर शुल्क वसुलीचा प्रस्ताव मंजूर केल्याने या निर्णयाविरोधात भाजप, कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी सभात्याग केला. 

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ताज हॉटेलसमोरील रस्ता आणि पदपथ हॉटेल व्यवस्थापनाने ताब्यात घेत तो पादचाऱ्यांसह वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्या बदल्यात हॉटेलकडून शुल्क वसुल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता; मात्र नंतर सुरक्षेसाठी या परिसरात बॅरीकेटिंग करण्यात आल्याने शुल्कात सुट देण्याची विनंती हॉटेल व्यवस्थापनाने केली होती. त्यानुसार रस्त्याच्या शुल्कात 50 टक्के सुट आणि पदपथाचे संपुर्ण शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीत मांडण्यात आला. त्यानूसार ताज हॉटेलला 8 कोटी रुपयांची सुट देण्यात येणार होती. या प्रस्तावावर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी चर्चा करण्याची विनंती केली; मात्र अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही चर्चा नाकारत प्रस्ताव परस्पर मंजूर केला. त्यावर, सर्व विरोधी पक्षांनी सभात्याग केला. 

26/11 च्या हल्ल्यात ताज हॉटेलही 72 तास दहशतवाद्यांच्या गनपॉईंटवर होते. या हल्ल्यानंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा, महाराष्ट्र व मुंबई पोलिस यांनी ताज व्यवस्थापनाला परिसराच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ताज हॉटेल व्यवस्थापनाने रस्ते व फुटपाथ ताब्यात घेतले आहे. आज तेच÷त्यांची देखभाल करत आहेत. तसेच यापुर्वी ताज हॉटेल व्यवस्थापनाने शुल्कही भरलेले आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. 

---- 
लोकायुक्तांकडे दाद मागणार 
शिवसेना श्रीमंताच्या मागण्या मान्य करत आहे. कोव्हिडमुळे पालिकेचे उत्पन्न घटलेले असताना, अशी शुल्कात माफी देऊन पालिका स्वत:चे आर्थिक नुकसान करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. लोकायुक्तांनी याच प्रकरणात पालिकेला धोरण ठरविण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे आता पुन्हा लोकायुक्तांना निवेदन देऊ, असे रवी राजा यांनी सांगितले. 


ताज हॉटेललाचा माफी का ? 
मुंबई शेअर बाजार आणि ट्रायडंट हॉटेलच्या परीसरातील काही भागातही वाहतुक बंद केली आहे; मात्र पादचाऱ्यांसाठी हे रस्ते खुले आहेत. तरीही त्यांच्याकडून शुल्क वसुल केले जात असून ट्रायडंट हॉटेलनेही शुल्क भरले आहे; मग, ताज हॉटेललाच माफी का, असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच, सामान्यांचा 100 टक्के मालमत्ता करासह सर्व उपकर शुल्क माफ व्हावे, अशी मागणी भाजप करत आहे; मात्र सामान्यांना दिलासा देण्याऐवजी शिवसेना श्रीमंतांना शुल्क माफी देत आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

Opposition leaders criticize Mumbai Municipal Corporation over Taj Hotel fee waiver

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT