मुंबई

सावधान, आज मुंबई, ठाणे, रायगडमध्ये जोरदार वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईसह संपुर्ण कोकणात आज म्हणजेच गुरुवारी पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होणार असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मुंबई वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तेलंगणामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तेलंगणामध्ये अतिवृष्टी होत असून मध्य महाराष्ट्रात सोलापूरसह काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 12 तासात कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर कमी होणार असला तरी कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार आहे. तर पुढील काही दिवस समुद्रही खवळलेला राहाणार आहे. समुद्र किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमिटर वेगाने वारे वाहाणार असून काही वेळ वाऱ्याचा वेग 60 किलोमिटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत काल संध्याकाळ पासून ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. मेघगर्जना आणि विजेच्या लखलखटासह पावसाच्या काही सरी कोसळल्या. रात्रीपासून पावसाची रिपरीप सुरु झाली. मुंबईत संध्याकाळपर्यंत कुलाबा येथे कमाल 31.2 आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. तर, सांताक्रुझ येथे कमाल 32.7 आणि किमान 25.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.

कोकणातील पावसाची शक्यता पाहाता नाविक दल, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण बल तसेच स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचा आणि सज्जतेचा इशारा देण्यात आला.

orange alert in mumbai thane raigad heavy to very heavy rains are expected by IMD

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT