मुंबई

मुंबईत 6 लाखांच्या वर कोरोना चाचण्या...  दिवसभरात 917 नवीन रुग्णांची भर    

मिलिंद तांबे

      

मुंबई : मुंबईत आतापर्यंत 6 लाख 13 हजार 745 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून बाधित रुग्णांची संख्या 1,25,239 झाली आहे.आज 917 रुग्णांची भर पडली असून आज 48 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 6,890 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,154 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 79 टक्के इतका आहे.  

मुंबईत आज नोंद झालेल्या 48 मृत्यूंपैकी 33 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 37 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 48 रुग्णांपैकी तिघांंचे वय 40 वर्षा खालील होते. 25 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 20 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.  
                 
कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1,154 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 99,147 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 88 दिवसांवर गेला आहे. तर 10 ऑगस्ट पर्यंत एकूण 6,13,745  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  4 ऑगस्ट  ते 10 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.79 इतका आहे. 

मुंबईत 591 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,415 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 4,208 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 3,784 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: कर्जाच्या डोंगरामुळे तरुण शेतकऱ्याने दिला जीव

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT