मुंबई

मुंबईत दाखल होणाऱ्या खासगी बसद्वारे प्रवाशांची ओव्हरलोड वाहतूक, नियमांची पायमल्ली

प्रशांत कांबळे

मुंबई: राज्य सरकारने दिवाळी गर्दीचा हंगाम लक्षात घेता खासगी बसला 100 टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली. मात्र, खासगी बस वाहतुकदारांकडून याचा गैरफायदा घेऊन आसन क्षमतेपेक्षाही जादा प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. रात्रीच्या अंधारात वातानुकूलित स्लीपर गाडीमध्ये अतिरिक्त प्रवाशांना बसवून राज्यभरात खासगी प्रवासी व्यवसाय धडाक्याने सुरू असल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत असल्याने एकीकडे राज्य सरकार लॉकडाऊन घेण्याच्या विचारात आहे.  तर गर्दी टाळण्यासाठी रेल्वे, लोकल सेवा सुद्धा तात्पुरत्या बंद करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी मॅरेथॉन बैठका सुद्धा सुरू आहे. मात्र, दुसरीकडे खासगी बस मधून राज्यभरात सर्रास प्रवाशांची कोंबून वाहतूक केली जात आहे. 

प्रवासादरम्यान कोविड 19 च्या नियमांचे कोणतेही पालन होत नसल्याचे दिसत असून प्रवाशांनी याला विरोध केल्यास खासगी बस वाहतुकदारांकडूनच प्रवाशांना उलट दमदाटी केली जाता असल्याचे प्रवाशांकडून सांगितल्या जात आहे. ओव्हरलोड प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस सर्वात जास्त विदर्भ, मराठवाड्यातून मुंबईसाठी धावत आहे. दरम्यान अतिरिक्त प्रवास भाडे सुद्धा आकारल्या जात आहे.

 
कोविडची तपासणी  न करताच आंतरराज्य प्रवासी वाहतूक

गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, आध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गोवा राज्यातून मुंबईत दैनंदिन शेकडो खासगी बस दाखल होत आहे. या खासगी बसमधून दररोज कोरोना काळात आपल्या गावी गेलेले कामगार परत येत आहे. मात्र, परत येताना त्यांची कोणत्याही प्रकारची कोरोना तपासणी होत नसल्याने आंतरराज्य मार्गावरही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. 
    
परिवहन विभागाच्या अशा आहेत सूचना

  • बसचे आरक्षण चौकशी कक्ष स्वच्छता करावी
  • कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असतांना मास्क सॅनिटायझरचा वापर करावा, 
  • मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बस मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, 
  • बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे
  • बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावे. 
  • बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी 
  • ताप , सर्दी, खोकला, असल्यास प्रवास करण्यास प्रतिबंध 
  • प्रवासाच्या आधी प्रवाशांचे तापमान चेक करावेत 
  • एसटीच्या दीड पट पेक्षा जास्त भाडे आकारू नये

असे होते उल्लंघन

  • खासगी बस वाहतुकदारांकडून क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक केली जाते.
  • खासगी स्लीपर बसमध्ये सरासरी 30 प्रवाशांची संख्या असताना 40 ते 45 प्रवाशांना बसवले जाते.
  • चालकाच्या कॅबिनमध्ये किंवा बसमधील मधल्या जागेतही अतिरिक्त प्रवाशांना बसवले जाते.
  • सवलतीत प्रवास करण्याच्या नावाखाली दोन बर्थमध्ये तीन-चार प्रवाशांना बसवले जाते. 

ओव्हरलोड प्रवासी वाहतूक प्रकरणात संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. संबंधित खासगी बस वाहतुकदारांवर कारवाई करण्यात येणार असून, त्याला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. त्याव्यतिरिक्त अशा पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहे.
अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Overloaded transport passengers private bus arriving Mumbai violation of rules

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

SCROLL FOR NEXT