मुंबई

भविष्यातील शिक्षणक्षेत्र बदलाची नांदी ! ऑनलाइन शाळेला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे; मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी  शाळा, शिक्षक व पालकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्यासाठी पालकांच्या व्हाट्सॲप, फेसबुकचा व मोबाईल संदेशांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे झालेला बदल ही शिक्षण क्षेत्रातील नांदी असल्याचे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे. 

समाजमाध्यमांचा वापर करुन शिक्षक दररोज अभ्यास देऊन त्याची तपासणी करीत आहेत. शंका, चुका दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष संपर्क करुन त्या दुर केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थी अभ्यासात रमले असून शैक्षणिकदृष्ट्या त्यांचे नुकसान होत नसल्याने पालक व शिक्षणप्रेमी समाधानी आहेत. इच्छा असेल मार्ग दिसतो व शिक्षणाचा प्रवाह घरी राहूनही सतत सुरू ठेवता येतो हे या उपक्रमातून शिक्षकांनी दाखवून दिले आहे.

शिक्षण विभागानेही शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांना स्मार्ट फोन असलेल्या पालकांची सूची बनविण्यास सांगितले आहे. त्यांचे व्हाट्सॲप गट बनविले जाणार आहेत. कोरोनाची ही साथ जगावर संकट म्हणून समोर आली असताना शिक्षण क्षेत्र या संकटावर मात करण्यासाठी पुढे सरसावले आहे.

समाजमाध्यमांचा वापर करुन प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडविण्यास दिल्या आहेत. विद्यार्थी त्या नियमित सोडवून वर्ग शिक्षकांना सोडवुन दाखवत आहेत. त्यामुळे पालक अतिशय समाधानी असल्याचे दिसून येत आहे.  
सर्व शिक्षकांनी जर अशाच प्रकारचे उपक्रम राबविले तर मुलांचा अभ्यास मागे राहणार नाही आणि कोरोना संसर्गही मुलांना होणार नाही. - तृप्ती सावंत,शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा बनोटी

मोठी बातमी -  कोरोनाची चेन तोडण्यासाठी 'इथे' स्वतःच नागरिकांनी केला आपला परिसर सील

कोरोनामुळे सुट्टी जाहीर झाल्यापासून विद्यार्थी व्हाट्सॲप गट बनविले आहेत. या ग्रुपवरून अभ्यास दिला जात आहे. एक सकारात्मक असे पाऊल यानिमित्ताने पुढे पडत आहे. या बाबीचा भविष्यातील शिक्षण क्षेत्रावर चांगला परिणाम होईल. - मनोहर पूरी, माध्यमिक शिक्षक, माणगाव

overwhelming response to online learning education experts are expecting change in future
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Latest Marathi News Live Update : केदारनाथ मंदिरासाठी चालवल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवा खराब हवामानामुळे स्थगित

SCROLL FOR NEXT