crime sakal
मुंबई

नवी मुंबई : ऑक्सिजन आणि पाणी पळवणारे महाचोर ; गणेश नाईक

शिवसेना व राष्ट्रवादीवर गणेश नाईकांचे अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र

सुजित गायकवाड

नवी मुंबई : शहरातील नागरीकांना तहानलेले सोडून त्यांच्या हक्काचे पाणी गुपचुप पळवणे आणि ऑक्सिजन चोरून (Oxygen and water Thief)घेऊन जाणारे महाचोर आहेत, अशा शब्दांत माजी मंत्री आणि भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी शिवसेना (Shiv Sena)आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. एमआयडीसीतील भूखंड लाटण्याचा प्रयत्न केला, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करु, भले जेलमध्ये जावे लागले तरी चालेल असा खरमरीत इशारा नाईकांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

ऐरोलीतील महापालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच्या (Oxygen plant)उद्घाटनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांत नाईकांनी नाव न घेता शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मंत्र्यांवर तोफ डागली. मी जर ठरवले, तर आरपारची लढाई करायची माझी क्षमता आहे, पण दुसऱ्याचा अवमान, अपमान व्हावा दुसऱ्याला दुखावले जाऊ नये म्हणून बोललो नाही, असा निर्वाणीचा इशारा देत नाईकांनी भाषणाला सुरुवात केली. या शहराचे पाणी चोरण्याचा प्रयत्न केला गेला. दिघा, ऐरोली एमआयडीसीतील भागातील लोकांना तहाणलेले ठेवून ते पाणी दुसऱ्यांना गुपचुप देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नाईकांनी केला. एखाद्या घरातून वस्तू चोरी करतात तसे, रबाळे एमआयडीसीत ऑक्सिजनची निर्मिती होत असताना दुसऱ्या कोविडच्या लाटेत ऑक्सिजन चोरण्याचा प्रकार झाला, अशा चोरणाऱ्यांना महाचोर बोलतात. असा पुनरुच्चार नाईकांनी केला. बोलताना नाईकांनी सांगितले की, आपल्याला कधी दुसऱ्याला अपमानीत करायला आवडत नाही. पण आमच्या समोर नवी मुंबईच्या जनतेची कोणी वाट लावत असेल अशा वेळेस गप्प बसलो, तर येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही.(Mumbai News)

भले तर आंदोलन करु.

एमआयडीसीने अलिकडे भूखंड विकायला काढले आहे. राज्याने चार एफएसआय मंजूर केले आहे. भविष्यात जेव्हा शहराची वाढ होईल तेव्हा काय करणार? काही ठिकाणी जमिनीखालून फायबर ऑप्टीकल केबल, पाण्याच्या लाईन गेल्या आहेत. अशा जागांवर काही लोकांनी हॉटेल उभारण्याचा घाट घातला असल्याचा आरोप आमदार गणेश नाईक यांनी केला. एमआयडीसीच्या भूखंडांवर नजर ठेवा, नाही तर हे महाचोर पुन्हा हे भूखंड लाटण्याची संधी सोडणार नाही. त्याकरीता वृक्षा रोपण करा, असे आवाहान नाईकांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच पुन्हा असे वागल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करु, वेळ पडल्यास जेलमध्ये जाऊ पण असा अन्याय सहन करणार नाही. असा दमवजा इशारा नाईकांनी सत्ताधाऱ्यांना दिला.(Mumbai Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा

Rupali Dhamdhere PhD : तळेगाव ढमढेरेच्या रूपाली ढमढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर

सलग दोन सुपरहिट हॉरर पट अन् पहिलं सिनेमॅटिक युनिव्हर्स; दिग्दर्शक प्रीतम पाटील यांची बॉक्स ऑफिसवर हवा!

IND vs ZIM 3rd T20I: अभिषेक शर्मा OUT, ४ खेळाडू IN? तिसऱ्या ट्वेंटी-२० साठी कशी असेल भारताची Playing XI? प्रिन्स यादव जखमी...

'सनई चौघडे' आणि 'हास्यजत्रा'नंतर निमिष कुलकर्णीची मोठी झेप; 'द्विधा'तून मोठ्या पडद्यावर एन्ट्री

SCROLL FOR NEXT