मुंबई

मुंबईकरांना दिलासा; शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये ऑक्सीजनची पातळी सामान्य.... 

संजय घारपुरे

मुंबई ः मुंबईत कोरोनाची साथ राखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळे त्यांची सुरुवातीस तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांच्यातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांमध्ये ऑक्सिजनची पातळी सामान्य असल्यामुळे महापालिका प्रशासनाची चिंता काहीशी कमी झाली आहे.

आतापर्यंत मुंबई महापालिकेने 6 लाख 74 हजार 53 व्यक्तींची ऑक्सिजन पातळी तपासल्याचे वृत्त आहे. त्यातील 6 लाख 71 हजार 312 लोकांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 95 किंवा त्यापेक्षा जास्त आढळले होते. त्यापैकी केवळ 2 हजार 471 लोकांमध्येऑक्सिजनचे प्रमाण 95 पेक्षा कमी होते. त्याचाच अर्थ हे प्रमाण 0.40 टक्के इतके कमी आहे.

ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवले जाते. आवश्यकता भासल्यास त्यांना कोव्हिड केअर सेंटरला पाठवले जात आहे. आवश्यकता भासल्यास त्यांची कोव्हिड चाचणी होत आहे. त्यामुळे लक्षण आढळण्यापूर्वीच त्यांचे विलगीकरण होत आहे त्यामुळे उपचाराच्यावेळी फारसे प्रश्न येत नाहीत, असे महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ रमेश भारमल यांनी सांगितले. मुंबई महापालिकेने सहा लाखाहून जास्त वरिष्ठ नागरीकांची ऑक्सिजन तपासणी केली तसेच एक कोटीहून जास्त लोकांचे स्क्रीनिंग झाले आहे. त्यानुसार रुग्णांच्या विलगीकरणाबाबत निर्णय घेत आहोत, हेच भविष्यातही सुरु राहणार आहे, असे मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्त सुरेख काकानी यांनी सांगितले. 

मुंबईत आत्तापर्यंत एक लाखाहून जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील सहा हजार जणांचे निधन झाले आहेत. निधन झालेल्यांपैकी पाच हजार लोकांचे वय 50 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर कोरोनाची साथ वाढत असताना पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे लक्षात येत होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांची ऑक्सिजन तपासणी करण्यास सुरुवात केली होती.
----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेचं बांगलादेशला गिफ्ट, भारतासमोर नवं संकट; वस्त्रोद्योगाला बसू शकतो फटका

Gold Rate Today : सोनं-चांदीचे भाव घसरले! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Kolhapur Traffic : कोल्हापुरात ट्रॅफिकचा स्फोट! ‘मास्टर प्लॅन’ कागदावरच राहणार का, की महापालिका घेणार ठोस निर्णय?

Ladki Bahin Yojana KYC : लाडक्या बहिणींची ‘केवायसी’ चुकली, ९९ हजार महिलांनी केली चूक, एका कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! खात्यात थेट ६००० जमा होणार? रखडलेल्या ४ हप्त्यांची रक्कम एकत्रच मिळणार

SCROLL FOR NEXT