मुंबई

पालघरमध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या करुन भिंतीत लपवला मृतदेह

पूजा विचारे

मुंबईः पालघरमध्ये एका फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. वाणगावमधील वृंदावन या इमारतीच्या एका फ्लॅटमधील भिंतीत तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. 

प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. हत्येच्या आरोपाखाली तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

गेल्या  4 महिन्यांपूर्वी उमरोळी येथील अमिता मोहिते ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह करण्यास घरातून निघून गेली. मात्र ती परत न आल्याने तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. या 4 महिन्यांच्या काळात तरुणीचा प्रियकर तिचं सोशल मीडिया वापरत असून व्हॉट्सएपद्वारे तो तरुणीच्या घरच्यांशी त्यांची मुलगीच असल्याचं भासवून संपर्कात होता. मात्र तरुणीच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी बोईसर पोलिसा ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तपासात तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांना प्रियकराने दिली. धक्कादायक बाब म्हणजे फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेऊन या तरुणाने स्वतः भिंतीवर बांधकाम केलं. शिवाय तो यांचं फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून भाड्यावर रहात होता. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या अधिक तपास सुरू आहे.

Palghar boyfriend hide girlfriend body flat wall from four months

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

Virat Kohli Fact Check: तीन दिवसाच्या अंतरात लंडनला चार्टर्ड फ्लाईटने फेरी... विराटने खरंच RCB कडे मागणी? स्वत: च पोस्ट करत केला खुलासा

SCROLL FOR NEXT