जल्लोष करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार रोहिणी शेलार sakal
मुंबई

पालघर : गारगाव गटावर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

तालुक्यातील सर्वात महत्वाच्या समजल्या जाणा-या गारगाव गटावर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला झेंडा फडकवला

दिलीप पाटील

पालघर : तालुक्यातील सर्वात महत्वाच्या समजल्या जाणा-या गारगाव गटावर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला झेंडा फडकवला आहे. ही निवडणुक शिवसेनेने अतिशय प्रतिष्ठेची केली होती. शिवसेनेचे अनेक नेते येथे ठाण मांडून बसले होते.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वांना धोबी पछाड देत ही जागा कायम राखली आहे. गारगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी शेलार, शिवसेनेच्या निलम पाटील व भाजपच्या करूणा वेखंडे रिंगणात होते.

मात्र भाजपने ऐनवेळी निवडणूकीच्या आदल्या दिवशी माघार घेतल्याने भाजप स्पर्धेतून बाद झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आमनेसामने उभे ठाकले होते.शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे ,पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार रविंद्र फाटक हे या गटात विशेष लक्ष ठेवून होते तर आमदार शांताराम मोरे व ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील हे या गटात ठाण मांडून बसले होते. मतदार संघातील प्रत्येक गावात घर टु घर प्रचार हे करत होते.

भाजपच्या उमेदवाराला ऐनवेळी माघार घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्यात शिवसेना यशस्वी ठरली होती. मात्र मतदारांनी शिवसेनेला झिडकारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात आपली मते टाकली.

आमदार दौलत दरोडा यांच्या विधानसभेमध्ये गारगाव हा भाग येत असून दौलत दरोडा यांनी ही निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. दरोडा यांचे स्वीय सहाय्यक रोहिदास शेलार यांच्या पत्नी रोहिणी शेलार या निवडणुकीत रिंगणात उतरल्या होत्या.त्यामुळे राष्ट्रवादीला पराभूत करण्याचा चंगच शिवसेनेच्या नेत्यांनी बांधला होता. मात्र शिवसेनेची ही रणनिती असफल होऊन रोहिणी शेलार या एक हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्याने शिवसेनेला चांगलीच चपराक बसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT