Loksabha Election 2024 Esakal
मुंबई

Palghar Loksabha Election : पालघर निवडणुकीसाठी चिन्हवाटप! कोणाला मिळाले कोणते चिन्ह पहा?

लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर रिंगणात दहा उमेदवार उतरले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पालघर - निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके, निवडणूक निरीक्षक अजय सिंग तोमर, अपर जिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ६) चिन्हांचे वाटप करण्यात आले. या वेळी बहुजन विकास आघाडीला आपली पूर्वीची निशाणी ‘शिट्टी’ हे चिन्ह मिळाले. चिन्ह वाटप झाल्याने उमेदवारांच्या प्रचाराला आता जोर येणार आहे.

लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर रिंगणात दहा उमेदवार उतरले आहे. त्यानंतर उर्वरित १० उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यतप्राप्त पक्षांचे चिन्ह निवडणूक आयोगाने ठरवून दिले आहेत. तर अपक्ष आणि उर्वरित पक्षांना विविध चिन्हे बहाल केली आहेत.

यात तीन अपक्ष उमेदवारांना अनुक्रमे खाट, विहीर, बॅटरी अशी चिन्हे मिळाली आहेत. आता यानंतर प्रचाराला वेग येणार नाही. त्यादृष्टीने उमेदवार, कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. सध्या पालघर लोकसभा मतदारसंघात बविआ, महायुती आणि मविआच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे सांगण्यात येते.

जिजाऊचा पाठिंबा कोणाला?

निवडणुकीत जिजाऊ संघटनेच्या उमेदवारांनी पालघर लोकसभा उमेदवारी मागे घेतली असून, आता ते कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात, याबद्दल पालघर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. ते बविआ अथवा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवतील, असे सांगितले जात आहे.

सांबरे स्वतः भिवंडी मतदारसंघात निवडणूक लढवत असून, पालघर मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. तसेच बोईसर येथे मोठा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता; मात्र आता ते कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात, हे अजून समजू शकले नाही.

बविआ ‘शिट्टी’साठी आग्रही

अनेक वर्षांपासून बविआ ‘शिट्टी’ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बविआचे शिट्टी हे चिन्ह प्रसिद्ध होते. प्रचार मोहिमा आणि निवडणूक जाहिरातींतील कल्पकतेतूनही पक्षाला या चिन्हाने लौकिक प्राप्त करून दिलेला होता.

बविआ आणि शिट्टी हे समीकरण बनलेले होते; मात्र २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या चिंतामण वनगा यांच्या अकाली निधनाने २०१८च्या लोकसभा पोटनिवडणुकीत हे चिन्ह नोंदणीकृत नाही, असा आक्षेप शिवसेना-भाजपने घेतल्याने निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवले होते.

त्यानंतर आताच्या लोकसभा निवडणुकीसाठी राजेश पाटील यांनी अर्ज दाखल करताना ‘शिट्टी’ चिन्हासाठी दावा केला होता. बविआने निवडणूक आयोगाच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करत हे चिन्ह पुन्हा मिळवण्यात यश मिळवले आहे.

असे झाले चिन्हांचे वाटप

उमेदवार - पक्ष - निवडणूक चिन्ह

राजेश पाटील - बविआ - शिट्टी

डॉ. हेमंत सवरा - महायुती - कमळ

भारती कामडी - ठाकरे गट - मशाल

विजया म्हात्रे - वंचित बहुजन आघाडी - गॅस सिलिंडर

भरत वनगा - बसप - हत्ती

मोहन गुहे - भारत आदिवासी पार्टी - हॉकी आणि चेंडू

राहुल मेढा - मार्क्सवादी लेनिन - रेड फ्लॅग

अमर कवळे - अपक्ष - बॅटरी

दिनकर वाढान - अपक्ष - विहीर

मीना भड - अपक्ष - खाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : एमपीएससी निकालावर आरक्षण धोरणाचा 'ब्रेक'! १०७ उमेदवारांचा न्यायालयीन लढा; अंतिम निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता

Crime News Sangli : तू माझे स्टेटस का बघत नाहीस? थेट गेला महिलेच्या घरी अन्... तलवार काढून महिलेसोबत केलं भयानक कृत्य

PM Modi Video Viral : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल! गमछा हवेत फिरवत शेतकऱ्यांना दिला खास संदेश

ट्रेनमध्ये तिकीट बूकिंगच्या नियमात बदल, लोअर बर्थ कुणाला मिळेल? झोपण्याची वेळही ठरली

Shreyas Iyer ला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज! नेमकं काय घडलं, भारतात कधी परतणार? BCCI ने दिले नवे अपडेट्स

SCROLL FOR NEXT