मुंबई

पालघर साधु हत्या प्रकरण : अठरा पोलिसांवर सरकारकडून कारवाई

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 7 : पालघरमधील साधुंच्या हत्येबाबत राज्य सरकारने आतापर्यंत एकूण 18 पोलिसांवर कारवाई केली आहे, अशी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.

राज्य सरकारने एका पोलिस अधिकाऱ्याला पदच्युत केले आहे. तर दोघांना सक्तीची निव्रुत्ती दिली आहे. याचबरोबर पंधरा जणांवर वेतन कपातीची कारवाई केली आहे. पालघरमध्ये दोन साधूंसह तिघांची जमावाने दगडाने ठेचून हत्या केली होती. याप्रकरणी सीबीआय तपासणी केली जावी अशी मागणी शशांक झा यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या मागणीला विरोध करणारे पुरवणी प्रतिज्ञापत्र सरकारकडून आज दाखल करण्यात आले. यामध्ये तपासाचा कृती अहवाल देखील दाखल करण्यात आला.

राज्य सरकारने याप्रकरणी विभागीय चौकशी केली असून संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच 252 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. पुण्यातील गुन्हा तपास विभागाने तपास केल्यानंतर यामध्ये पालघर आणि ठाणे बाल न्यायालयात दोन आरोपपत्र दाखल केले आहे.

न्यायालयाने या प्रतिज्ञापत्रावर बाजू मांडण्यासाठी अन्य पक्षकारांना अवधी दिला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी दिनांक 15 नोव्हेंबररोजी होणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

palghar lynching case maharashtra state government took action on 18 policemen

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT