Panther death sakal media
मुंबई

मुंबई : नॅशनल पार्कमधील बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi national park) येऊर रेंजमधील कम्पार्टमेंट क्र. 112, चेना वेस्ट बीट, चेना राउंडच्या हद्दीपासून सुमारे 100 ते 150 मीटर अंतरावर काल संध्याकाळीएक बिबट्या मृतावस्थेत (Panther death) आढळून आला.हा सुमारे 3 वर्षे वयाचा नर बिबट्या होता. तो प्राणी C-40 म्हणून ओळखला जात होता. एखाद्या अपघातात त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून अधिक चौकशी करण्यात येत आहे. (Panther doubtful death in sanjay gandhi national park)

बोरीवली येथील वन्यजीव रुग्णालयात मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनात तो एखाद्या छोट्या आघातात किंवा कदाचित उंचीवरून पडल्यामुळे मयत झाला असावा असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

परिणामी त्याचे यकृत फाटून अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. मृत्यूचे संभाव्य कारण म्हणून हायपोव्होलेमिक शॉक होते. या घटनेची पुढील चौकशी सुरू आहे अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागाचे मुख्य वन संरक्षक, संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

SCROLL FOR NEXT