crime
crime sakal media
मुंबई

महिलेच्या अश्लील व्हिडीओंद्वारे पनवेलमध्ये १० लाखांची खंडणी

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : येथील एका गॅस एजन्सीमध्ये (Gas Agency) काम करणाऱ्याने आपल्या ओळखीतील एका विधवा महिलेची (widow) चोरून काढलेली अश्लील छायाचित्रे व व्हिडीओ (pornographic video) सोशल मीडियावर (social video) व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे दहा लाख रुपयांच्या खंडणीची (money extortion) मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला. नारायण गोदारा असे संशयिताचे नाव असून, पनवेल तालुका पोलिसांनी (panvel police) त्याच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

संबंधित महिला पनवेल येथे आपल्या भावाच्या घरी राहते. संशयित आरोपी नारायण गोदारा हा मूळचा राजस्थानी असून, तो उरण नाका येथील एका गॅस एजन्सीमध्ये कामाला होता. दोन वर्षांपूर्वी त्या महिलेच्या घरातील गॅस शेगडी नादुरुस्त झाली होती. त्या वेळी गोदारा याने महिलेच्या घरातील गॅस शेगडी दुरुस्त करून दिली होती. त्यावेळी त्याने महिलेला आपला मोबाईल नंबर देऊन पुन्हा काही अडचण आल्यास फोन करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने महिलेला फोन करून तिच्यासोबत संपर्क साधून मैत्री वाढविली.

दरम्यान, डिसेंबर २०२० मध्ये गोदारा अपघातात जखमी झाला. त्यानंतर तो आपल्या मूळ गावी गेला. त्यावेळी त्याने महिलेला फोन करून आपल्या गावी बोलावून घेतले होते. त्यावेळी महिला त्याच्याघरी पाच दिवस राहिली होती. त्याच कालावधीत त्याने महिलेची अश्लील छायाचित्र व व्हिडीओ काढले होते. दरम्यान, त्याने ती छायाचित्र दाखवून तिच्याकडे १० लाख रुपयांची मागणी मागण्यास सुरुवात केली; मात्र तिने त्याला नकार दिल्यानंतर त्याने ते नातेवाईक व गावातील त्याच्या मित्रांना व्हॉट्सॲपवर पाठवले. या प्रकारानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT