panvel
panvel  
मुंबई

कोरोनाचा कहर, पनवेलमध्ये सहा आठवड्यात ३४० मृत्यू

दीनानाथ परब

पनवेल: कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने (Panvel corporation) वेगवेगळ्या उपायोजना केल्या. पण वाढता मृत्यूदर ही एक चिंता वाढवणारी बाब आहे. मागच्या सहा आठवड्यात ३३ टक्के रुग्णांचा कोरोनाने मृत्यू (corona death) झाला आहे. मे महिन्याच्या पहिल्या १३ दिवसात पनवेल महापालिका हद्दीत कोरोनामुळे १५२ मृत्यू झाले. दिवसाला सरासरी १२ रुग्णांचा मृत्यू झाला. (Panvel sees 340 Covid-19 deaths in six weeks)

कोरोनाच्या या वाढत्या मृत्यूदरासाठी नागरीक खराब आरोग्य व्यवस्था आणि पनवेल महापालिकेच्या तयारीला जबाबदार ठरवत आहेत. घरी उपचार घेणारे रुग्ण उशिरा रुग्णालयात येत असल्यामुळे मृत्यूदर जास्त असल्याचे पीएमसीकडून सांगण्यात आले.

पनवेलची लोकसंख्या ८ ते १० लाखाच्या घरात आहे. पीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, ५४,५१२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. रिकव्हरी रेट चांगला आहे. खासकरुन दुसऱ्या लाटेत. पण मृत्यूदर अजूनही नियंत्रणात आलेला नाही. मार्चच्या आधी पनवेल महापालिका क्षेत्रात ६७३ मृत्यू झाले. त्यानंतर पुढच्या ४३ दिवसात एकूण मिळून १,०१३ मृत्यू झाले.

महापालिकेचे खासगी रुग्णालयांवर लक्ष नाहीय. त्याबद्दल काही धोरणच नाहीय. पनवेलमध्ये फक्त ५० व्हेंटिलेटर्स आहेत. आम्ही संपूर्णपणे आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर्ससह कोविड रुग्णालयाची मागणी करत आहोत. पण मागच्या वर्षभरात काहीही घडलेले नाही, असे कांतीलाल काडू यांनी सांगितले. ते पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT