Panvel Railway Station sakal
मुंबई

Traffic Transport Block : पनवेल स्थानकात आणखी नवीन ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक!

पनवेल स्थानकात सोमवार पासून शुक्रवार (२ ते ६ ऑक्टोबर) रात्रीपर्यत पाच दिवस मध्यरात्री ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक आता आणखी तीन दिवस वाढविण्यात आलेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पनवेल स्थानकात सोमवार पासून शुक्रवार (२ ते ६ ऑक्टोबर) रात्रीपर्यत पाच दिवस मध्यरात्री ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक आता आणखी तीन दिवस वाढविण्यात आलेला आहे. तसेच ब्लॉकचा वेळेतही बदल करण्यात आला आहे. आता मध्य रेल्वेने गुरुवार पासून ते सोमवारपर्यत मध्यरात्री १.३० ते पहाटे ४. ४५ वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान लोकलच्या वाहतुक बदल करण्यात आला आहे.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या अप आणि डाऊन दोन नवीन रेल्वे मार्गिका बांधकामासाठी पनवेल उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंगचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. त्यामुळे शनिवार व रविवारच्या सुट्टीत पनवेल येथे मोठा ब्लॉक रेल्वेकडून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पनवेल ईएमयू स्टॅबलिंग साइडिंगचे काम केल्यानंतर गुरुवारपासून ट्रेन ऑपरेशनसाठी पाच स्टॅबलिंग साइडिंग्ज बसवण्याकरिता आणखी तीन दिवस मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक गुरुवार पासून सोमवारी (५ ते ९ ऑक्टोबर) रात्रीपर्यत पाच दिवस मध्यरात्री ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक असणार आहे. मध्यरात्री १.३० ते पहाटे ४. ४५ वाजेपर्यत हा ब्लॉक असणार आहे.

ब्लॉक दरम्यान डाऊन हार्बर मार्गावर पनवेलसाठी सीएसएमटी स्थानकातून शेवटची लोकल रात्री ११ वाजून १४ मिनिटांनी सुटणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे स्थानकातून पनवेलकरिता रात्री ११.३२ ची शेवटची लोकल धावणार आहे. पनवेल स्थानकातून ठाण्याकरिता शेवटची लोकल रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे. सीएसएमटी ते पनवेल ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन वेळापत्रकानुसारच धावणार आहे.

ब्लॉक नंतरचे वेळापत्रक (५ ते ८ऑक्टोबर)

  • ठाणे-पनेवल पहिली लोकल - सकाळी ६.२०वा

  • पनवेल-सीएसएमटी पहिली लोकल - पहाटे ५.१७ वाजता

  • पनेवल-ठाणे पहिली लोकल - सकाळी ५.४४ वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT