anil deshmukh chitra wagh 
मुंबई

'ओ बाब्बो...', लेटरबॉम्बवर चित्रा वाघ यांची रिअ‍ॅक्शन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडीनंतर नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकला आहे. यात परमबीर सिंग यांनी थेट राज्याच्या गृहमंत्र्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी वाझेंना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा दावा या पत्रात केला आहे. या पत्रासोबत चॅटसुद्धा जोडलं असून मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे. यावरून आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी असं म्हटलं आहे. तसंच नैतिकतेच्या दृष्टीने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हे प्रकरण आता दूरपर्यंत जाईल अशा आशयाचं ट्विट केलं आहे. 

फडणवीसांची प्रतिक्रिया
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी जळजळीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, हे पत्र फक्त खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याच अधिकाऱ्याने आतापर्यंत गृहमंत्र्यांबाबत असं पत्र लिहिण्याची पहिलीच वेळ आहे. या परिस्थितीत गृहमंत्री त्यांच्या पदावर राहू शकत नाहीत. आता त्यांनी राजीनामा द्यायला हवा असंही फडणवीस म्हणाले. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असल्याचं म्हटलं जातंय. असं असेल तर तात्काळ कारवाई व्हायला हवी. सरकार वाचवण्यासाठी, सरकार जाऊ शकतं असा संशय आल्यानं दुर्लक्ष केलं असण्याची शक्यता आहे असेही फडणवीस म्हणाले. 

चित्रा वाघ यांचे ट्विट
चित्रा वाघ यांनी टीका करताना म्हटलं की, 'ओ बाब्बो...लो कर लो बात....अब बात निकलही गई है तो फिर दूर तलक जायेगी.' याआधीही चित्रा वाघ यांनी अनेक मुद्द्यांवरून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे प्रकरण असो किंवा टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर केलेले आरोप असोत. यांच्या राजीनाम्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. 

गृहमंत्र्यांनी फेटाळले आरोप
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना असं म्हटलं की, स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांची धडपड सुरु आहे. परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याचं देशमुख यांनी सांगितलं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

Pune Metro Expansion : पुणे मेट्रोचा विस्तार २०० किलोमीटरवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो भवनचे उद्‍घाटन

CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT