परमबीर सिंह-अरबाज खान  
मुंबई

अभिनेता अरबाज खानकडून परमबीर सिंह यांनी पैसे उकळले - सोनू जलान

मारहाण केल्यानंतर माझ्याकडे १० कोटीची मागणी

सुरज सावंत

मुंबई: व्यावसायिक सोनू जलानने आज पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग (Parambir sing) यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. परमबीर सिंग, राज कुमार कोथमिरे, प्रदीप शर्मा आणि इतर यांनी मला रवी पुजारीचा साथीदार दाखवून माझाकडून खंडणी उकळली, असा आरोप सोनू जलानने (sonu jalan) केला आहे. (Parambir sing extort money from actor arbaz khan sonu jalan)

"मी आतापर्यंत घाबरत होतो. मात्र मी मनाची समजूत काढून घरातल्यांना विश्वासात घेऊन मी आता पुढे आलोय" असे सोनू जलानने सांगितले. "मी १३ महिने जेलमध्ये होतो, ज्या दिवशी मला अटक झाली, त्यावेळी मला परमबीर सिंह यांच्या कँबिनमध्ये नेलं. तेथे मला प्रदीप शर्माला सहकार्य कर" असे सांगितले.

"कॅबिनमध्ये कोथमिरे आणि अन्य दोन शिपाई होते. मी आतमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला मला मारलं. त्यानंतर माझ्याकडे १० कोटींची मागणी केली" असा आरोप सोनू जलानने केला. "परमबीर हे काही करू शकतात. कोणी पैसे दिले? कसे दिले? हे सांगितलं तर त्या व्यक्ती गायब होतील. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. गुन्हा नोंदवला की मी सर्व पुरावे देईन" असं सोनू जलान म्हणाला. अभिनेता अरबाज खानकडूनही परमबीर सिंह यांनी पैसे घेतले होते, असा गंभीर आरोप सोनू जलानने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT