parambir-singh sakal media
मुंबई

"परमबीर सिंह यांच्यावरील खंडणीच्या गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट जारी करा"

सुनिता महामुनकर

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस (Marine drive police) ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हात (extortion case) सिंह यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट (nonbailable warrant) जारी करावे, अशी मागणी करणारा अर्ज मुंबई पोलिसांनी (Mumbai police) आज केला.

यापूर्वी अन्य दोन प्रकरणात ठाणे आणि मुंबई न्यायालयाने सिंह यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. अतिरिक्त महानगर दंडाधिकारी बुधवारी मुंबई पोलिसांच्या अर्जावर सुनावणी घेण्याची शक्यता आहे. सिंह यांच्यावर आतापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले आहेत. मार्चमध्ये त्यांना आयुक्त पदावरून होम गार्ड महासंचालक नियुक्त करण्यात आले आहे.

मात्र त्यांच्या वरील आरोपांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे, असे प्रमुख सरकारी वकील शेखर जगताप यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, सिंह यांचे सहकारी संजय पुनामिया यांनी जामिनाची अट पूर्ण केली नाही म्हणून न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. तपास अधिकार्यांकडे हजेरी लावण्याची अट त्यांनी पूर्ण केली नाही असे जगताप यांनी सांगितले. पुनामिया यांना तीन प्रकरणात जामीन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांचं राज्य! ODI World Cup मध्ये दिसणार बदलाचे वारे; ICC च्या ऐतिहासिक निर्णयाचे जगभरातुन कौतुक

Panchayat Raj : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’; गावाच्या विकासासाठी आता मोठी संधी!

Latest Marathi News Updates Live : इचलकरंजीत पाणी प्रश्नावर महाविकास आघाडी आक्रमक

Kalyani Komkar Statement: वनराजच्या डेड बॉडीवर हात ठेवून सांगितलं होतं... आयुष कोमकरच्या आईने काय सांगितलं? Exclusive माहिती

Chhagan Bhujbal: नातेवाईक की नातेसंबंध? दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे; भुजबळांनी सगळं उलगडून सांगितलं

SCROLL FOR NEXT