sachin-waze  
मुंबई

'वाजेला दिवसाला २ कोटीचं टार्गेट', परमबीर यांच्याबद्दल नवीन गौप्यस्फोट

कोरोनामुळे वसुलीला फटका बसला होता. तक्रारदाराच्या जबाबात भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांचाही उल्लेख आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) पुन्हा अडचणीत आले आहेत. तुरुंगात असलेल्या सचिन वाजे (Sachin waze) व त्यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात (goregav police station) वसुलीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. हा गुन्हा बिमल अग्रवाल (bimal agarwal) या व्यापाऱ्याने नोंदवला आहे. अग्रवालने पोलिसांना दिलेल्या जबानीत धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. आपला एक नंबर बॉस परमबीर सिंग आहेत, असं सचिन वाझेने सांगितल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे.

तक्रारदाराच्या जबाबात भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांचाही उल्लेख आहे. "पोलीस सेवेत दाखल होण्यापूर्वीच सचिन वाजेने व्यापारी व बुकींसोबत मिटिंग केली होती. पोलिस दलात नियुक्त होण्यापूर्वीच वसुलीसाठी वाजेची व्यापारी, बार मालक आणि बुकींसोबत बोलणी सुरु होती" असे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले.

"परमबीर सिंग यांना रोजचं 2 कोटीचं कलेक्शन हवं होतं, कोरोनामुळे वसुलीला फटका बसल्याने वाझेला हे टार्गेट दिले होते. वसुलीतील ७५ टक्के पैसे १ नंबरला तर २५ टक्के पैसे वाटून घेण्याचं प्लान ठरला होता" असा तक्रारदाराचा दावा आहे. कोरोना काळातील झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी पालिकेतील कंत्राटदारांनाही वाजेने लक्ष्य केलं होतं, असं तक्रारदाराने पोलिसांना सांगितलं.

परमबीर सिंग आयुक्त झाल्यानंतर वाजेने हॉटेल-बार चालकांना तसेचं बुकींना दरवाजा उघडा ठेवून व्यवसाय करायची हमी दिली होती, असं तक्रारदाराने आपल्या जबानीत म्हटलं आहे. परमबीर सिंग, सचिन वाजे आणि त्यांचे इतर सहकारी तक्रारदाराचा ही मनसुख हिरेन करतील अशी भिती तक्रारदाराला आहे. त्यामुळेच घरातल्यांसाठी त्यांनी संरक्षण मागितलं आहे.

जानेवारी-फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ मध्ये आरोपींनी आपल्याकडून ९ लाख रुपये वसूल केले होते, असे बिमल अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. अग्रवाल यांनी त्यांच्या तक्रारीत गोरेगाव मध्ये BOHO रेस्टॉरंट एंड बार आणि अंधेरी ओशिवारा मध्ये BCB रेस्टॉरंट एंड बार चालवण्यासाठी सचिन वाजे आणि इतर आरोपीनी ९ लाख रुपये, सँमसंग कंपनीचे फोल्ड -२ मोबाइल हप्ता म्हणून घेतले, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी IPC कलम ३८४, ३८५ आणि ३४ कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT