Sharad-Pawar-Parambir-Ribeiro 
मुंबई

ज्युलियो रिबेरोंचं नाव घेत शरद पवारांनी काढली परम बीर सिंग यांची 'विकेट'?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: सचिन वाझे प्रकरणात नुकतीच बदली झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यात, 'गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला बार आणि इतर आस्थापनांकडून महिन्याचे १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिलं होतं' असं त्यांनी नमूद केलं. या आरोपांवरून राज्य सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठली. या मुद्द्यावर, "परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्युलियो रिबेरो यांच्यासारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत करावी", अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषद घेत ज्युलियो रिबेरो यांच्या नावाचा उल्लेख केला. रिबेरो यांच्या नावाचा उल्लेख करत पवारांनी परमबीर सिंह यांची विकेट काढल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.

परमबीर सिंह-ज्युलियो रिबेरो आले होते आमने-सामने...

२०१८साली परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी ५ जूनला ज्युलियो रिबेरो यांनी एक लेख लिहिला होता. 'महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले व स्वच्छ चारित्र्यांचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पदांवर ठेवले आहेत. वादग्रस्त आणि अपात्र पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी महत्त्वाच्या पदापासून दूर ठेवलं आहे', अशा आशयाचा लेख रिबेरो यांनी लिहिला होता. त्यावेळी महत्त्वाच्या पदांसाठी परमबीर सिंह यांचं नाव चर्चेत होतं, पण त्यांची निवड झाली नाही. त्यानंतर काही दिवसांनी, परमबीर सिंह यांनी रिबेरो यांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली. रिबेरो यांच्या लेखाने माझी प्रतिमा मलीन झाली असून त्याबद्दल रिबेरोंनी माझी मागावी आणि माझ्याबाबत केलेले आरोप मागे घ्यावेत अन्यथा मी त्यांच्या मानहानीचा दावा ठोकेन, असं त्या पत्रात नमूद केलं होतं. रिबेरो यांच्या कार्यकाळात त्यांनी तपासात हस्तक्षेप व हयगय केल्याचाही आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

आज शरद पवार यांनी परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याबाबत ज्युलियो रिबेरो यांचे नाव घेतले. परमबीर सिंह यांच्या कार्यपद्धतीबाबत पुरेशी माहिती असलेल्या रिबेरो यांना सिंह यांचीच चौकशी करण्याची विनंती करण्याबाबत विधान करून पवारांनी सिंह परमबीर सिंह यांचीच विकेट काढल्याचं बोललं जात आहे.

कोण आहेत ज्युलिओ रिबेरो...

पद्मविभूषण पुरस्कराने सन्मानित करण्यात आलेले ज्युलियो रिबेरो हे मुंबई पोलीस आयुक्त होते. पंजाब पोलीस, गुजरात पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९८०च्या सुरूवातीच्या काळात पंजाबमध्ये तणावाची परिस्थिती उद्भवली होती, तेव्हा त्यांनी पंजाब पोलीस दलाचे नेतृत्व केले होते. रिबेरो यांना जीवे मारण्याचा दोन वेळा प्रयत्न झाला. १९८६ साली पंजाब पोलीसांच्या मुख्यालयात सहा लोकांनी पोलिसांचा वेष परिधान करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होते. तर १९९१ साली रोमानियामध्ये ते भारताचे सदिच्छादूत म्हणून गेले असताना त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. रिबेरो यांचे 'बुलेट फॉर बुलेट: माय लाइफ अॅज अ पोलीस ऑफिसर' नावाचे आत्मचरित्रदेखील प्रकाशित झाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ

Shegaon News : वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध; शेगावात काँग्रेसचे आंदोलन

Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेसाठी भाजप आमदारांचे फडणवीसांना साकडे

SCROLL FOR NEXT