ganesha statue  
मुंबई

मोठी बातमी! यावर्षी 'अशी' असणार बाप्पाची मूर्ती..परळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईच्या गणेशोत्सवाची शान म्हणजे मोठ मोठ्या गणेश मूर्ती. या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावाट आहे. यामध्ये गणेशोत्सव साधेपणाने साजारा करण्याचा निर्णय मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला. यामध्ये गणेश मूर्तीची उंची कमी करण्याबाबत मंडळांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याबाबत आता परळच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं मोठा निर्णय घेतला आहे.

 परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळ राजाने या वर्षी तीन फूटाची गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गणेश मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेणारे ते पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठरले. तसेच खेतवाडी 6 वी गल्ली गणेशोत्सव मंडळाचाही या वर्षी गणेश मूर्तीची उंची कमी करणाचा निर्णय विचारधीन आहे. 

परळच्या राजाची मूर्ती दरवर्षी 23 फूटाची असते. गणेशोत्सवादरम्यान परळ विभागाला जत्रेचे स्वरुप आलेले असते. लाखो भाविक दररोज संध्याकाळी या परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणरायाचे दर्शन येतात. कोरोनाचे संकट लक्षात घेता अनेक वर्षाच्या परंपरेला छेद देत सामाजिक अंतर राखण्यासाठी , गर्दीची संभाव्यता टाळण्यासाठी गणेश मूर्तीची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंडळाकडून सांगण्यात आले. 

तसेच परळच्या राजाची विसर्जनाची मिरवणूक निघणार नसून गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्ये करण्यात येईल. त्याप्रमाणे विभागातील परळच्या राजाची वर्गणी देखील न घेण्याचा निर्णय मंडळाने शनिवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने  उत्तम निर्णय घेतला असून या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

गेल्या आठवड्या वडाळ जीएसबी गणेशोत्सव मंडळाने कोरोनाच्या संकटामुळे सामाजिक अंतर राखण्यासाठी भाद्रपदातील गणेश चतुर्थी ऐवजी माघ महिन्यातील गणेश चतुर्थीला गणेशोत्सव साजारा करण्याचा निर्णय घेताला. छोट्या चाळीतले व बिल्डिंग मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशमूर्ती छोट्या व दीड दिवसाचा गणपती बसवण्याचा निर्णयाच्या विचारधीन आहेत. मुंबईतल्या मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या जून महिन्यात  मंडळाच्या कार्यकारिणीची बैठकी होणार आहेत. त्यावेळी प्रत्येक मंडळ गणेशोत्सवाबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

parel ganesh idol will be of 3 feets read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT