mobile alert 
मुंबई

पालकांची चिंता मिटणार! पाल्य शाळेत न पोहचल्यास मोबाईलवर येणार अलर्ट..वाचा बातमी  

समीर सुर्वे

मुंबई: घरातून निघालेला मुलगा नक्की शाळेत पोहचलाय का हे बघण्यासाठी पालकांना शाळेत जाण्याची गरज भासणार नाही. पालकांच्या मोबाईलवरच अलर्ट येणार आहे.

महानगर पालिका शिक्षण विभागासाठी सोफ्टवेअर आणि मोबाईल अॅप्लिकेशन तयार करत आहेत. त्यासाठी स्वारस्याची अभीरुची मागविण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या संपुर्ण व्यवस्थापनासाठी हे अॅप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे.

यात शिक्षकांच्या हजेरीसह नोटीस परीपत्रक ही ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. तसेच शाळांमधील सुविधांची माहितीही सहज मिळू शकेल. शिक्षकांची सर्व महितीही मिळणार आहे.

पालकांच्या सुविधेचाही या अॅप्लिकेशन मध्ये विचार केला आहे. पालकांना विद्यार्थांंंंची प्रगती तपासण्यासाठी शाळेत जाण्याची गरज पालकांना भासणार नाही. या मोबाईल अॅप्लिकेशन वरुन पालकांना दैनंदिन हजेरीसह सर्व माहिती मिळणार आहे. त्याच बरोबर शाळांची प्रगतीही अॅप्लिकेशन मध्ये नोंदवली जाणार आहे. त्यामुळे अधिकार्यांनाही एखाद्या शाळेची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

काय असेल या अप्लिकेशनमध्ये: 

-- विद्यार्थांची प्रगती ऑनलाईन तपासता येणार. 

-- विद्यार्थी शाळेत न आल्यास पालकांना अलर्ट जाणार.

-- शाळांमधिल कागदपंची कमी होऊन सर्व व्यवहार ऑनलाईन होणार 

-- विद्यार्थी, शिक्षकांची हजेरी ऑनलाईन नोंदवली जाणार.

-- शिक्षकांची माहिती एका क्लिकवर मिळणार.

-- नोटीस ,परीपत्रक ऑनलाईन उपलब्ध होणार.

-- विद्यार्थांचे पोषण आहार, उपस्थीती भत्ता नोंदवला जाणार.

-- विद्यार्थांची कागदपत्र ऑनलाईन मिळणार. 

संपादन : अथर्व महांकाळ 

parents receive alert if student will not reach school 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेलं, 30 वर्षीय डाॅक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत

MHADA: म्हाडा जमिनींचे सोने करणार, जाहिरातींसाठी जागा भाड्याने देणार

पोलिसांनी गळा पकडला, मारहाण अन् शिवीगाळ केली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसोबत भयानक घडलं; बोर्डाची चौकशीची मागणी

Kharif Season: खरीपपूर्वी शेतकऱ्यांना मोठा झटका! खतांच्या दरात मोठी वाढ, DAP-युरियाच्या तुटवड्याने चिंता वाढली

IAF Plane Crash हवाई दलाच्या विमानाचे लँडिंगनंतर दोन तुकडे, आगीचा भडका; ५ अधिकाऱ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT