मुंबई

मुंबईत अनधिकृत पार्किंग केल्यास होणार 23 हजारापर्यंत दंड!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत पार्किंगवर धडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त प्रविणसिंग परदेशी यांनी दिले आहेत. त्यानुसार आजपासून (रविवार) या कारवाईला सुरवात करण्यात येत आहे. या अंतर्गत या परिसरात एखादे अवजड वाहन अनधिकृतपणे पार्किंग केल्यास त्यावर किमान 15 हजार तर कमाल 23 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.

पालिकेच्या अधिकृत पार्किंगच्या 500 मीटर परिसरातील अनधिकृत पार्किंगवर ही दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात शहरातील 23 ठिकाणी ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. मध्यम आकाराच्या वाहनांवर 11 हजार रुपये तर कार, जीप यांसारखे वाहन अनधिकृतपणे पार्किंग केल्यास 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. रिक्षा किंवा साईडकार असलेले तीनचाकी पार्क केल्यास त्यावर 8 हजार रुपये तर दुचाकी वाहनांवर 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

दरम्यान, सध्या 23 ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ सुरू असून, यापैकी 7 ठिकाणचे वाहनतळ हे ठेकेदाराची नियुक्ती होईपर्यंत मोफत असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT